मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tillu Tajpuria Murder: तिहार जेलमध्ये पुन्हा टोळीयुद्ध, कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरियाची कारागृहात हत्या

Tillu Tajpuria Murder: तिहार जेलमध्ये पुन्हा टोळीयुद्ध, कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरियाची कारागृहात हत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 02, 2023 10:09 AM IST

Tillu Tajpuria Murder: कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरिया हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात झालेल्या टोळीयुद्धात मारला गेला. टिल्लू यांच्यावर लोखंडी सरळीईने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याला दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Tillu Tajpuria Murder
Tillu Tajpuria Murder

दिल्ली : गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर दिल्लीच्या तिहार कारागृहात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुरुंगात झालेल्या टोळीयुद्धात त्याच्यावर लोखंडी सरळीई जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कारागृह क्रमांक ८ मध्ये बंद असलेल्या योगेश टुंडा नावाच्या कैद्याने तुरुंग क्रमांक ९ मध्ये बंद असलेल्या टिल्लूवर लोखंडी सरळीईने हल्ला केला.

Muzaffarpur fire : मुझफ्फरपूरमध्ये अग्नितांडव! चार बहिणी जिवंत जळाल्या; झोपेत काळाने घातला घाला

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी कोर्ट गोळीबारातील आरोपी गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर प्रतिस्पर्धी टोळी सदस्य योगेश टुंडा आणि इतरांनी तिहार तुरुंगात हल्ला करून त्याची हत्या केली. गंभीर अवस्थेत त्यांना दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.

Pet Animal : आता पाळीव कुत्रे आणि मांजरांना रेल्वेतून नेणे होणार शक्य, ऑनलाईन बुक करता येणार तिकीट

पश्चिम विभागाचे अतिरिक्त डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी ७ वाजता तिहार तुरुंगातून घडली. डीडीयू रुग्णालयात आणलेल्या दोन अंडरट्रायल कैद्यांपैकी एक सुनील उर्फ ​​टिल्लूहा बेशुद्धावस्थेत होता.

डॉक्टरांनी त्याला तपासले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. तर दूसरा जखमी कैदी रोहितवर याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. महिनाभरात तिहार जेलमध्ये आणखी एका गुंडाचा मृत्यू झाला आहे. गोगीच्या हत्येचा बदला म्हणून टिल्लूच्या या हत्येकडे पाहिले जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग