मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime News : क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संतापजनक घटनेनं पुण्यात खळबळ

Pune Crime News : क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संतापजनक घटनेनं पुण्यात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 28, 2023 02:34 PM IST

Kondhava Pune Crime News : आरोपी क्रीडा शिक्षक मुलींना अश्लिल मेसेज पाठवून सराव सुरू असताना तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायचा. परंतु आता या प्रकरणाचा एका स्वयंसेवी संस्थेनं भांडाफोड केला आहे.

Kondhava Pune Crime News
Kondhava Pune Crime News (HT_PRINT)

Kondhava Pune Crime News : शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर क्रीडा शिक्षकानंच अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील कोंढव्यात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी क्रीडा शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याला तातडीनं अटक केली आहे. अविनाश गोविंद चिलवेरी असं आरोपी क्रीडा शिक्षकाचं नाव असून 'गुड टच बॅड टच' उपक्रम राबवणाऱ्या स्वयंसेवी संघटनेनं हा संतापजनक प्रकार उघडकीस आणला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील लोणीकंद परिसरात एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता कोंढव्यातही अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोंढवा परिसरातील एका महानगरपालिकेच्या शाळेत क्रीडा शिक्षक असलेल्या अविनाश गोविंद चिलवेरी हा गेल्या काही दिवसांपासून एका अल्पवयीन मुलीला अश्लिल मेसेज पाठवत होता. याशिवाय शाळेत क्रीडा स्पर्धांचा सराव करत असताना शिक्षक मुलीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायचा. शाळेतील अनेक मुलींशी जवळीक साधून आरोपी शिक्षकानं त्यांचे चुंबन घेऊन मिठी मारली होती. त्यानंतर शाळेतील शिक्षक गैरवर्तन करत असल्याची तक्रार पीडित मुलींनी घरच्यांकडे केली. त्यानंतर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी अविनाश विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी कोंढव्यातील अनेक शाळांमध्ये एका स्वयंसेवी संस्थेद्वारे 'गुड टच बॅड टच' हा उपक्रम राबवला जात आहे. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मुलींना लैंगिक अत्याचाराबद्दल बोलतं करण्याचा प्रयत्न केला असता मुलींनी शिक्षकांनी अत्याचार केल्याचं सांगितलं. त्यानंतर स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची माहिती मुलींच्या पालकांना देत पोलिसांतही तक्रार दाखल केली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point