मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कसबा-चिंचवडमधील भाजपच्या उमेदवारांची नावं फायनल?, देवेंद्र फडणवीस दिल्लीतून थेट पुण्यात होणार दाखल

कसबा-चिंचवडमधील भाजपच्या उमेदवारांची नावं फायनल?, देवेंद्र फडणवीस दिल्लीतून थेट पुण्यात होणार दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 28, 2023 02:05 PM IST

Devendra Fadnavis : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं पाच नेत्यांची नावं दिल्लीत पाठवली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल होणार असल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Kasba Peth and Chinchwad By Elections
Kasba Peth and Chinchwad By Elections (HT)

Kasba Peth and Chinchwad By Elections : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर आता पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीसाठी आज भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले असून ते दिल्लीतून थेट पुण्यात दाखल होणार आहे. त्यामुळं फडणवीस पुण्यात दाखल झाल्यानंतर आता भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं धीरज घाटे, हेमंत रासने, गणेश बीडकर, कुणाल टिळक आणि शैलेश टिळक यांची नावं केंद्रीय समितीला पाठवल्याची माहिती भाजपा नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले असून आज दुपारी चार वाजेपर्यंत ते पुण्यात दाखल होणार आहे. त्यामुळं फडणवीस पुण्यात आल्यानंतर भाजपच्या उमेदवारांची नावं फायनल होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी कसबा पेठसह चिंचवडमध्ये बैठकांचं सत्र घेतलेलं आहे. त्यामुळं आता कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार?, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

तीन दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळीच भाजपचे उमेदवार जाहीर होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी बैठकीत रणनीती आखून अनेक नावांवर चर्चा केली होती. त्यानंतर पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकांची जबाबदारी आमदार महेश लांडगे, आमदार माधुरी मिसाळ आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

IPL_Entry_Point