मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google Layoffs : उमेदवाराची मुलाखत सुरू असतानाच HR ची नोकरी गेली; कर्मचाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव

Google Layoffs : उमेदवाराची मुलाखत सुरू असतानाच HR ची नोकरी गेली; कर्मचाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 28, 2023 01:28 PM IST

Google Layoffs News : गुगलमध्ये नोकरीसाठी उमेदवाराची मुलाखत घेत असताना एचआरला कामावरून काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Google Layoffs Live Updates
Google Layoffs Live Updates (HT)

Google Layoffs Live Updates : गेल्या काही महिन्यांपासून भारतासह आंतराराष्ट्रीय पातळीवरील अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात येत आहे. एकीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरकपात होत असतानाच आता गुगल कंपनीनंही तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतंही कारण न देता गुगल कंपनीनं कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यामुळं जगभरात खळबळ उडाली आहे. कर्मचारी ऑफिसमध्ये येत असताना त्यांना नोकरीवरून कमी केल्याचं समजलं. त्यामुळं आता गुगलच्या या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता उमेदवाराची मुलाखत घेत असताना एचआरला नोकरीवरून काढल्याचा धक्कादायक प्रकार गुगलमधून समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, गुगल कंपनीतील एचआर डॅन लॅनिगन-रायन हे एका उमेदवाराची नोकरीसाठी मुलाखत घेत होते. त्यावेळी अचानक व्हिडिओ कॉल कट झाल्यामुळं मुलाखत बंद पडली. त्यानंतर रायन यांनी उमेदवाराशी फोनवर बोलत असताना त्यांना नोकरीवरून काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचं अकाऊंट बंद करण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर एचआर रायन यांनी या प्रकरणाबाबत त्यांच्या मॅनेजरशी संपर्क केला असता त्यांना नोकरी गेल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांना तसा मेलही केला गेल्याचं मॅनेजरनं कळवलं.

त्यानंतर रायन यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळं आता गुगलमध्येच अशा प्रकारे नोकरीवरून काढण्यात येत असेल तर इतर कंपन्यांमध्ये काय अवस्था असेल?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अॅमेझॉन, लिंक्डिन, फेसबुक, मेटा यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर आता गुगल कंपनीतही कर्मचारी कपात करण्यात आल्यामुळं खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता अनेक कर्मचाऱ्यांना धक्कादायकरित्या कामावरून काढण्यात आल्याचे अनेक अनुभव कर्मचारी माध्यमांशी शेयर करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग