मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : मुख्यमंत्र्यांवर बोलताना विनायक राऊतांची जीभ घसरली, शिवीगाळ करत म्हणाले...

Shiv Sena : मुख्यमंत्र्यांवर बोलताना विनायक राऊतांची जीभ घसरली, शिवीगाळ करत म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 18, 2022 08:28 AM IST

CM Eknath Shinde vs MP Vinayak Raut : मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांची जीभ घसरली आहे.

CM Eknath Shinde vs MP Vinayak Raut
CM Eknath Shinde vs MP Vinayak Raut (HT)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद आणखी एकदा पेटला आहे. कारण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांची जीभ घसरली आहे. त्यामुळं आता शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असा पुन्हा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत मुंबईतील दहिसरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, शिंदे गटाला उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं आहे, शिवसेनेचं नाव पुसून टाकायचं आहे, या भ#$%*@#^ करणारे ४० आमदार आमचीच खरी शिवसेना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु या लोकांना आता रस्त्यावर उतरून उत्तर देण्याची वेळ आल्याचं विनायक राऊत म्हणाले.

आतापर्यंत शिवसेनेत अनेक लोक आले आणि अनेक लोक गेले, परंतु शिवसेना तेव्हा संपली नाही, उटल वेगानं वाढली. पक्षातील ४० आमदार आणि १२ खासदार गेले असले तरी घाबरू नका. या बंडखोरांविरोधात रस्त्यावरील लढाई जिंकण्यासाठी तयार रहावं, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपला दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की देवेंद्र फडणवीसांवर आल्याचं सांगत 'भगवान के पास देर है, लेकिन अंधेर नही है', असं सांगत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. गद्दारांना गाडण्याची वेळ आली असून या बंडखोर शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आमदारांचं डिपॉझिट मागाठाण्यातून जप्त केलं जाईल. असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

IPL_Entry_Point