मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad pawar: ‘एकच मुलगी, बरं वाईट झालं तर चितेला अग्नी कोण देणार?’ पवारांनी सांगितला एक जुना किस्सा

Sharad pawar: ‘एकच मुलगी, बरं वाईट झालं तर चितेला अग्नी कोण देणार?’ पवारांनी सांगितला एक जुना किस्सा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 17, 2022 10:56 PM IST

माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असे नाही. तिला इच्छा पण नाही तशी,असे मी एका जुन्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. पण,एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात.माझामुलीबद्दलचा अंदाज सुप्रियाने चुकवला,अशी कबुली शरद पवार (Sharad pawar) यांनी दिली.

शरद पवार
शरद पवार

पुणे - सुप्रियाला राजकारणाची आवड नाही, त्यामुळे ती राजकारणातपडेल असं मला वाटत नाही, हे मी ३० वर्षांपूर्वी बोललो होतो. आता तुम्ही पाहताय ती राजकारणात आली. एका बापाचा अंदाज कसा चुकीचा असतो हेआज माझ्या मुलीनेच सिद्ध केले आहे. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे डॉक्टर असोसिएशनच्या' सिंगल डॉक्टर फॅमिली' या उपक्रमाचा शुभारंभ आज झाला. या कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (supriya Sule) उपस्थित होते. ज्या पालकांनी स्त्री जन्माचा, खासकरून एकच अपत्य ते ही मुलगी जन्माचा उत्सव साजरा केला आणि कुटुंब नियोजन केले. त्यासह स्त्री पुरुष समानतेचं प्रबोधन केलं अशा कुटुंबांना आजया कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होते. या कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थित लोकांच्याअनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

शरद पवार म्हणाले की, माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असे नाही. तिला इच्छा पण नाही तशी, असे मी एका जुन्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. पण, एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. माझा मुलीबद्दलचा अंदाज सुप्रियाने चुकवला, अशी कबुली शरद पवार यांनी दिली. पक्षामध्ये सामूहिक नेतृत्वाचा अवलंब करून निर्णय घेतले जातात. पण, वडील म्हणून हल्ली सुप्रिया सांगेल ते ऐकावे लागते, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवारांनी या कार्यक्रमात एक जुनी आठवण सांगितली. निवडणुकीसाठी प्रचारादरम्यान ‘एकच मुलगी, बरं वाईट झालं तर चितेला अग्नी कोण देणार?’ असे प्रश्न ग्रामीण भागातील ज्येष्ठांनी विचारले. पण, ‘जिवंत असताना मुलीशी नीट वागण्याची चिंता करायची की मेल्यावर चितेला अग्नी कोण देणार याची चिंता करायची?’, असा उलट प्रश्न मी विचारायचो, असेही पवार यांनी सांगितले.

दिलेले काम नेमकेपणाने पार पाडणे हे मुली चोखपणे करतात. आरक्षण दिल्यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा ५० टक्के कारभार महिलांच्या हाती आहे. लोकांची कामे होतात आणि भ्रष्टाचार होत नाही हा अनुभव आहे. राजकीय मतभेद झाले तरी आपल्या कर्तृत्वाने देशाची मन उंचावण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले हे वास्तव आहे. संधीची समानता असली पाहिजे. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरुषांकडे नाही. कर्तृत्व आहे हे इंदिरा गांधीं यांच्यासह अनेक महिलांनी सिद्ध केले आहे. मुली वैमानिक असल्याने विमान अपघात कमी झाले, याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, महिलांचे नेतृत्व स्वीकारावे याबाबत उत्तर भारताची मानसिकता दिसत नाही. उत्तम काम करेल या मानसिकतेतून महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या