शरद पवार (Sharad pawar ) राजकारणात कशी सोईची भूमिका घेतात, याचे दावा अजित पवार गट व भाजपकडून केले जातात. शरद पवारांवर आरोप करताना त्यांनी २०१४ मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे बोलले जाते. यावर शरद पवारांनी जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.
आम्हाला शिवसेना आणि भाजपला एकत्र येऊ द्यायचं नव्हतं, त्यामुळेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, पण अजित पवारांना राजकारणातील काही गोष्टी कळालेल्या नाहीत, असा टोला शरद पवारांनी (Sharad Pawar) लगावला. त्यावेळी भाजपला पाठिंबा देण्याची गोष्ट जरूर बोललो असेल, पण तसं काही केलं नाही, आम्ही आमचा रस्ता कधी सोडला नाही.
अजित पवार (ajit Pawar) म्हणाले होते की, २०१४ मध्ये तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, तेव्हाचभाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुरुवात झाली होती. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, त्यांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही. त्यावेळी काहीही करून आम्हाला शिवसेना आणि भाजपला एकत्र येऊ द्यायचं नव्हतं. त्यांची युती तोडण्यासाठी काही गोष्टी मी जरुर बोललो असेन मात्र म्हत्वाचा प्रश्न आहे की, शेवटी आम्ही तसे केले का?. भाजपला पाठिंबा देण्याबाबत जरूर बोललो असेन पण तसे काही केले नाही. आम्ही आमचामार्ग कधीच सोडला नाही.
राजकारणात अशा चर्चा अनेकदा होत असतात. मात्र शेवटी निर्णय महत्वाचा असतो. निर्णय काय तर मी भाजपबरोबर काही गेलो नाही. भाजपसोबत तुम्ही जाण्याबाबत तुम्ही सुचवू शकता. सुचवले म्हणजे स्वीकारले असे होत नाही.
अजित पवारांनी दावा केला की, १९८९ साली लोकसभेसाठीअजित पवारांना संधी द्या, अशी काही नेत्यांची मागणी होती. त्यावेळी अजितला दिल्लीला जाऊ द्या, मी काटेवाडीला जाऊन शेती करतो, असं शरद पवारांनी म्हटल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. तो दावा खोटा असल्याचं शरद पवारांनी म्हटलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थमंत्री व्हायचे होते. याची कबुली त्यांनी मला दिली होती, असा आणखी एक गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी या प्रचारसभेत केला. दरम्यान, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असं आश्वासन तत्कालिन भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘मातोश्री’ त बंगल्यात येऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झालेल्या बैठकीत दिलं होतं, याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी यावेळी केला.
संबंधित बातम्या