मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kasba Peth Bypoll : ठाकरेंचे मित्रपक्ष पोटनिवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या गडात काँग्रेसची गोची

Kasba Peth Bypoll : ठाकरेंचे मित्रपक्ष पोटनिवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या गडात काँग्रेसची गोची

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 06, 2023 01:04 PM IST

Kasba Peth Bypoll : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवार दिला आहे. परंतु आता शिवसेनेच्या मित्रपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळं मविआत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Kasba Peth Pune Bypoll
Kasba Peth Pune Bypoll (HT)

Kasba Peth Pune Bypoll : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळं टिळक कुटुंबियांसह ब्राह्मण महासंघ आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत कसब्याची जागा काँग्रेसला सुटलेली असली तरी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडनंही पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीची आज पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यात वंचितचाही उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं आता शिवसेनेच्या मित्रपक्षांमुळं भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची गोची होण्याची शक्यता असल्यामुळं मविआत संधर्षाची ठिणगी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडनं अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर केली असून वंचित बहुजन आघाडीही आज उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मनोज आखरे यांच्यासोबत युती केली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही शिवसेनेनं आघाडी केली होती. त्यामुळं आता कसब्यात शिवसेनेचा उमेदवार नसला तरी शिवसेनेचे मित्रपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळं त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या उमेदवारानं घेतली शैलेश टिळकांची भेट...

कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर धंगेकर यांनी भाजपवर नाराज असलेल्या शैलेश टिळक यांनी भेट घेत चर्चा केली आहे. त्यामुळं आता कसब्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि भाजपकडून हेमंत रासने हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय संभाजी ब्रिगेडकडून अविनाश मोहिते यांच्यासह वंचितचा उमेदवारही अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

IPL_Entry_Point