मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Stocks : अदानी समूहाचे शेअर्स सावरणार? तिमाही निकालांकडून मोठी अपेक्षा

Adani Stocks : अदानी समूहाचे शेअर्स सावरणार? तिमाही निकालांकडून मोठी अपेक्षा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 06, 2023 12:42 PM IST

Will Adani Stocks recovered this week : अदानी एन्टरप्राईजेसचे शेअर्स शुक्रवारी १.२५ टक्के अथवा १९.५० रुपये वाढीसह १५८४.२० वर बंद झाले होते. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्येही ७.९८ टक्के अथा ३६.८५ रुपये उसळीसह ४९८.८५ रुपयांवर बंद झाले होते.

adani ht
adani ht

Will Adani Stocks recoverd this week : २७ जानेवारीपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये निम्म्यापेक्षा जास्त घसरले. शुक्रवारी अदानी एन्टरप्राईजेसमध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली. हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्ससंदर्भात बाजारात उलथापालथ झालीच पण त्याचबरोबर संसदेतही गदारोळ निर्माण झाला आहे. या दरम्यान, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजपासून सुरु झालेल्या नव्या आठवडयात नवी उसळी दिसू शकते,कारण या कंपन्यांचे शेअर्स 'ओव्हर सोल्ड' झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अदानी समूहातील कंपन्यांची स्थिती

अदानी एन्टरप्राईजेसचे शेअर्स शुक्रवारी १.२५ टक्के अथवा १९.५० रुपयांच्या वाढीसह १५८४.२० रुपयांवर बंद झाले होते. अदानी पोर्ट्सचा शेअर्स ७.९८ टक्के अथवा ३६.८५ रुपये वाढीसह ४९८.८५ रुपयांवर बंद झाले. अदानी पाँवर ५ टक्के लोअर सर्किटसह १९२.०५ रुपयांवर बंद झाले. अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स १० टक्के लोअर सर्किटसह १४०१.५५ रुपयांवर बंद झाले. अदानी ग्रीनचे शेअर्स १० टक्के घसरणीसह ९३४.२५ रुपयांवर बंद झाले. अदानी टोटलचे शेअर्स ५ टक्के घसरणीसह १६२५.९५ रुपयांवर बंद झाले. एसीसी कंपनीचे शेअऱ्स ४.३९ टक्के वाढीसह १९२६.३० रुपयांवर बंद झाले. अंबुजा सिमेंटचे शेअर्स ६.०३ टक्के वाढीसह ३७३.७० रुपयांवर बंद झाले. त्याशिवाय एनडीटीव्हीचे शेअर्स ५ टक्के घसरणीनंतर २११.७५ रुपयांवर बंद झाले.

बाजाराच्या स्थितीबद्दल स्वतिका इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ विश्लेषक प्रवेश गौर म्हणाले की, अमेरिकेतील बाजारातील स्थितीवर सगळ्यांचे लक्ष राहिल. दरम्यान, परदेशी गुंतवणूकदांच्या गुंतवणूकीचा प्रवाह यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. कारण २०२३ च्या सुरुवातीच्या काळात या गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवला आहे. अदानी समूहाच्या घटनाक्रमानुसार, त्यांच्या शेअर विक्रीचे सत्र अद्याप सुरु आहे.

या कंपन्यांच्या निकालावर बाजाराची दिशा

या आठवड्यात भारती एअरटेल, हिरोमोटोकाॅर्प, हिंडाल्को आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. त्याशिवाय अमेरिकेतील महागाईची आकडेवारी येत आहे. रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरणही बाजाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. आयआयपीचे आकडेही येत्या शुक्रवारी जाहीर होत आहेत. या आठवड्यात टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट, भारती एअरटेल, हीरो मोटोकाॅर्प, हिंडाल्को, ल्यूपीन, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे डिसेंबरचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर शेअर बाजारातील चढ उतार अवलंबून असतील,

WhatsApp channel