मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune RTO Survey : पुणेकरांसाठी 'ही' वेळ धोकादायक! अपघातांची संख्या वाढली

Pune RTO Survey : पुणेकरांसाठी 'ही' वेळ धोकादायक! अपघातांची संख्या वाढली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 11, 2023 10:46 AM IST

Pune RTO News : पुणे आरटीओने शहरात होणाऱ्या अपघात प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण केले असून यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरात अपघातांची संख्या वाढली असून काही ठराविक वेळेत सर्वाधिक अपघात होत असल्याचे पुढे आले आहे.

Pune Accident
Pune Accident (HT)

पुणे : पुण्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या सोबतच पुण्यात आपघटचे प्रमाण देखील वाढले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने या बाबत सर्वेक्षण केले असून यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे . पुणे आणि जिल्ह्यात सायंकाळी ६ ते रात्री ९ आणि पहाटे २ ते ५ या वेळांत सर्वाधिक भीषण अपघात होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे 'आरटीओ'ने २०२२ व २०२३ मधील जानेवारी महिन्यातील रस्ते अपघाताचे तुलनात्मक विश्लेषण केले आहे. या सोबतच अपघातप्रवण क्षेत्रांचे 'जिओटॅगिंग' देखील करण्यात आले आहे. दरम्यान, आरटीओने केलेल्या विश्लेषणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुण्यात काही ठराविक वेळेत सर्वाधिक अपघात झाल्याचे पुढे आले आहे. या वेळेत झालेल्या अपघात सर्वाधिक मृत्यू देखील झाले आहेत. सायंकाळी ६ ते ९ आणि मध्यरात्री २ ते पहाटे ५ या वेळेत हे अपघात झाले आहेत. यामुळे या वेळेत वाहने चालवले नको रे बाबा म्हणण्याची वेळ आता पुणेकरांवर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील अपघाताचा आढावा घेतला असता यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या व मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती पुढे आली आहे. दुचाकी अपघातांचे व पादचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण एकूण अपघातांच्या ९० टक्के आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, शिरूर तालुका, जुन्नर तालुका येथे अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात जानेवारी २०२२ मध्ये दिवसा झालेल्या अपघात ३८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ४३ जन जखमी झाले. तर एकूण ८८ अपघातांची नोंद करण्यात आली. तर रात्री झालेल्या अपघात ५० ठार तर ३२ नागरिक जखमी झाले. तर १०२ अपघातांची नोंद या वेळेत झाली. जानेवारी २०२३ मध्ये दिवसा झालेल्या अपघात ५० जणांचा मृत्यू झाला. तर ८८ जन जखमी झाले. या महिल्यात दिवसा १६६ अपघातात झाले. तर रात्री झालेल्या अपघातात ५४ जन घर झाले तर ६८ जखमी झाले. जानेवारी महिन्यात रात्री १४५ अपघात झाले, अशी आरटीओने जारी केलेल्या अकडेवारीची माहिती आहे.

आरटीओ कार्यालयाने तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षिक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची अपघात रोखण्यासाठी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून रस्ता सुरक्षा प्रबोधन करणे व त्या दृष्टीने वाहन तपासणी केली जात आहे. त्याबरोबरच अपघात प्रवण क्षेत्राचे 'जिओटॅगिंग' या कार्यालयाकडून केले जात आहे. 'जिओटॅगिंग' झाल्यानंतर अपघातप्रवण क्षेत्रातील उपाययोजना संबंधित विभागाला कळविण्यात येणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग