मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Payal Ghosh: ‘मला काही झालं तर कुणालाच सोडणार नाही!’, अभिनेत्री पायल घोषची खळबळजनक पोस्ट

Payal Ghosh: ‘मला काही झालं तर कुणालाच सोडणार नाही!’, अभिनेत्री पायल घोषची खळबळजनक पोस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2023 07:39 AM IST

Actress Payal Ghosh Post Viral: मीटू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री पायल घोष हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अतिशय खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे.

Payal Ghosh
Payal Ghosh

Actress Payal Ghosh Post Viral: मीटू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री पायल घोष हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अतिशय खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक सुसाईड नोट लिहिली आहे. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे. या पोस्टमध्ये पायल घोषने आपल्या आत्महत्येबद्दल सांगितले आहे. पायल घोषने लिहिले आहे की, पोलिस तिच्या घरी पोहोचले आणि अशा परिस्थितीत तिने आत्महत्या केली, तर त्यासाठी सर्व लोक जबाबदार असतील.

पायलने #MeToo मोहिमेदरम्यान आवाज उठवला होता. पायाल घोष हिने बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर पायलने बिग बॉसमध्ये पोहोचलेल्या साजिद खानबद्दलही आपले मत व्यक्त केले, ज्यामध्ये तिने सलमान खानपासून ते वाहिनीपर्यंत सर्वांनीच फैलावर घेतले होते. आता पायल घोषने होळीचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘ओशिवरा पोलिस माझ्या घरी आले... मला काही झालं तर कुणालाच सोडणार नाही.. माझ्या मानसोपचारतज्ज्ञांना @Syedruxada विचारा की, मी सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे... मी सुशांत नाही, मी पायल घोष आहे... मी मेले तर सगळ्यांना अडकवून मरेन.’

अभिनेत्री पायल घोष हिने या आधी एका दिवसापूर्वी दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्यामध्येही एका सुसाईड नोटचा समावेश आहे. यात पायलने एका कागदावर लिहिले आहे की, 'मी पायल घोष, जर मी आत्महत्या केली किंवा मला हृदयविकाराचा झटका आला, तर ते लोक जबाबदार असतील...’ तिने शेअर केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये देखील आत्महत्येची धमकी देण्यात आली आहे.

पायल घोष ही पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी आहे. नुकतीच पायल घोष 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटात झळकली होती. पायल घोषने मीटू आरोपी साजिद खानविरोधात आवाज उठवला होता. २०२०च्या सुरुवातीला तिने सोशल मीडियावरून दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. २०१३मध्ये चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिचे शोषण केले होते, असा आरोप तिने केला होता.

IPL_Entry_Point

विभाग