मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nagma: बँकेचा मेसेज समजून क्लिक केलं अन् अकाऊंट रिकामं झालं! अभिनेत्री नगमासोबत मोठा सायबर फ्रॉड

Nagma: बँकेचा मेसेज समजून क्लिक केलं अन् अकाऊंट रिकामं झालं! अभिनेत्री नगमासोबत मोठा सायबर फ्रॉड

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 10, 2023 09:23 AM IST

Cyber Fraud with Nagma: बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी नगमा मोरारजीसोबत मोठा सायबर फ्रॉड झाला असून, त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेण्यात आले आहेत.

Nagma
Nagma

Cyber Fraud with Nagma: बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी नगमा मोरारजीसोबत मोठा सायबर फ्रॉड झाला आहे. नगमा यांच्या फोनवर एक मेसेज आला होता, ज्यातील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधील तब्बल एक लाख रुपये काढून घेण्यात आले. त्यांच्यासोबत मोठी सायबर फसवणूक झाली. या संदर्भात बोलताना नगमा यांनी सांगितले की, त्यांच्या फोनवर आलेला मेसेज हा खासगी नंबरवरून नसून, अगदी बँकेतून आलेल्या मेसेजसारखाच दिसत होता.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या काही दिवसांत अनेक जणांना अशाप्रकारे सायबर फसवणुकीला बळी पडावे लागले आहे. यामध्ये नगमा यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेले जवळपास सर्वच लोक एकाच खासगी बँकेचे ग्राहक असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सायबर फसवणुकीत अभिनेत्रीला तब्बल ९९,९९८ रुपये गमवावे लागले आहेत.

नगमा मोरारजी यांनी स्वतःसोबत ही फसवणूक कशी झाली हे देखील सांगितले आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांना अशा प्रकरणात सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. या प्रकारणाबद्दल सांगताना नगमा म्हणाल्या की, त्यांनी पाठवल्या गेलेल्या मेसेजवर क्लिक करण्यास सांगितले गेले होते. यानंतर काही वेळातच एका व्यक्तीचा फोन आला, ज्याने आपण स्वतःला बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने नगमा यांना सांगितले की, ते तिला केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतील. या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या फोनचा रिमोट ऍक्सेस घेतला होता, असे नंतर लक्षात आले.

नगमा यांनी स्पष्ट केले की, त्यांनी या लिंकवर कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. या फसवणुकीची माहिती देताना नगमा म्हणाल्या की, ‘फसवणूक करणाऱ्याने माझ्या इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन केल्यानंतर एक लाभार्थी खाते तयार केले आणि १ लाख रुपये एका राष्ट्रीयीकृत बँकेत हस्तांतरित केले. यादरम्यान मला अनेक ओटीपी मिळाले, ज्यात त्याने किमान २० वेळा हा प्रयत्न केल्याचे दिसून आले. सुदैवाने माझे फार मोठे नुकसान झाले नाही.’ नगमा यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग