मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urmi: मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार प्रेमाची धमाल; अण्णा नाईकांच्या ‘उर्मी’ चित्रपटाचा टीझर लाँच!

Urmi: मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार प्रेमाची धमाल; अण्णा नाईकांच्या ‘उर्मी’ चित्रपटाचा टीझर लाँच!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 10, 2023 03:49 PM IST

Urmi film teaser released: ‘उर्मी’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Urmi film teaser released
Urmi film teaser released

Urmi film teaser released: झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले ’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेचे दोन्ही सीझनही विशेष गाजले. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. विशेष म्हणजे अण्णा नाईक ही भूमिका साकारणारे माधव अभ्यंकर सतत चर्चेत होते. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळत होते. आता माधव अभ्यंकर एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगामी ‘उर्मी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मल्टिस्टारर ‘उर्मी’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून, १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समृद्धी क्रिएशननं 'उर्मी' चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता, चैताली प्रवीण चौधरी सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाचं पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विजय गटलेवार यांनी संगीत, अनंत कामत यांनी संकलन, कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी निभावली आहे.

या चित्रपटात अभिनेत्री रसिका सुनील, सायली संजीव अभिनेता चिन्मय उदगीरकर, नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर यांच्या मुख्य भूमिका असून ऋतुजा जुन्नरकर आणि सायली पराडकर या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. पती-पत्नी यांच्या नात्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे काय धमाल होते असं चित्रपटाची कथासूत्र असल्याचं चित्रपटाच्या टीझरवरून जाणवत आहे. त्यामुळे उत्तम स्टाकास्ट आणि धमाल गोष्ट असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. आता १४ एप्रिलला चित्रपटगृहात ‘उर्मी’ पाहता येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग