मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC चा दिलासा ! शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल! नवे परिपत्रक जारी

MPSC चा दिलासा ! शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल! नवे परिपत्रक जारी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 11, 2023 10:48 AM IST

Mpsc Recruitment : राज्य लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना दिलासा दिला आहे.

MPSC Recruitment 2023
MPSC Recruitment 2023 (HT)

Mpsc Recruitment : राज्य लोकसेवा आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवारांची वयोमार्यादा संपल्यास त्यांना आता दोन वर्षांची शिथिलता देण्यात येणार आहे. त्यांच्या विहीत वयोमर्यादेत तब्बल २ वर्षांची वाढ करण्यात आली आहे. हा लाभ केवळ ३१ डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी मिळणार आहे. या संदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने काढले असून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. सरकारने ३ मार्च ला निर्णय घेतल्यावर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

करोनाची वाया गेलेली दोन वर्ष तसेच विविध कारणांमुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने अनेज उमेदवार परीक्षेपासून मुकले. दरम्यान, अनेक उमेदवारांची वयोमार्यादा संपल्याने त्यांच्या मोठ्या संधि हुकल्या. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना पुन्हा एक संधि मिळावी, या हेतूने राज्य सरकारने २ मार्च रोजी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी असेलल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षाची शिथिलता दिली आहे. या बाबतचा शासन आदेश काढल्यावर राज्य लोकसेवा आयोगाने देखील परिपत्रक काढत या आदेशांवर शिकामोर्तब केले आहे.

सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधि मानली जात आहे.

 

'या' भरतीसाठी वयोमर्यादेमध्ये शिथिलता

उपअभियंता, विद्युत , गट अ

उपसंचालक, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

मुख्य खोदन अभियंता, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सहाय्यक रसायनी, गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सहाय्यक प्रशासन अधिकारी,गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास योजना

सहाय्यक आयुक्त, तांत्रिक, महाराष्ट्र तांत्रिक सेवा गट ब

सहाय्यक संचालक, राज्य रेशीम सेवा गट अ

रेशीम विकास अधिकारी राज्य रेशीम सेवा, श्रेणी एक, गट ब

सहाय्यक संचालक, गट ब सांस्कृतिक कार्य संचालनालय

महाराष्ट्र राज्यपत्रीत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३

या सर्व जाहिरातीमध्ये अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यास अंतिम दिनांक ३ एप्रिल २०२३ पर्यंत असेल.

IPL_Entry_Point

विभाग