मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : पुणे पोलिसांची मोठी कारवाई! २१ लाख किंमतीचे १७ पिस्तुल आणि १३ काडतुसे जप्त

Pune : पुणे पोलिसांची मोठी कारवाई! २१ लाख किंमतीचे १७ पिस्तुल आणि १३ काडतुसे जप्त

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 10, 2023 07:02 PM IST

Pune crime news: गावठी शस्त्रांची बेकायदा विक्री करणाऱ्या टोळीच्या पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.

Pune POlice
Pune POlice

पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने दोन मोठ्या कारवाया करत गावठी शस्त्रांची बेकायदा विक्री करणाऱ्या ७ सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २१ लाख ३२ हजार रुपयांचे १७ पिस्तुल व १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. अटक केलेल्या आरोपींवर अहमदनगर, वर्धा, पुणे जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

हनुमंत अशोक गोल्हार (वय २४, रा. मु.पो. जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर), प्रदीप विष्णू गायकवाड (वय २५, रा. मु.पो. ढाकणवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर मुरा. नगररोड, चहाट फाटा तालुका जिल्हा बीड), अरविंद श्रीराम पोटफोडे (वय ३८, रा. अमरापुरता शेवगाव जि. अहमदनगर), शुभम विश्वनाथ गरजे (वय २५, रा.मु.पो.बले ता. नेवास जि. अहमदनगर), ऋषिकेश सुधाकर वाघ (वय २५ रा.मु.पो. सोनई ता. नेवासा जि.अहमदनगर), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय २५, रा.मु.पो.खडले परमानंद ता. नेवासा जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात युनिट ६ गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे हद्दीत गस्त घालत असताना दोन आरोपी हे पुण्यातील वाघोली येथील नानाश्री लॉज समोर पिस्तुल विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्यांचे नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचला. या कारवाईत हनुमंत अशोक गोल्हार आणि प्रदिप विष्णू गायकवाड हे महीद्रा कार मध्ये व्यवहार करत असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीत १ गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे मिळाली. हे पिस्तूल त्याने विक्री करता आणले असल्याचे सांगीतल्याने त्यांचेवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. 

हनुमंत अशोक गोल्हार हा मुंबईतील २.८ कोटी रुपयांच्या दरोड्यातील आरोपी असून त्याच्यावर पुण्यातील भारती विद्यापिठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यांच्या चौकशीतून बेकायदा पिस्तूल विक्री करणारांची नावं समोर आली. त्यांच्याकडून एकूण १३ गावठी बनावटीचे पिस्तूल ४ जिवंत काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाइल असा २१ लाख ३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या कारवाईत युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे हृददीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना बारणेरोड सिंचन भुवन समोर एक व्यक्ती हा उभा असून त्याच्याकडे अनधिकृत पिस्टल असल्याचे समजल्याने त्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून साहील तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (वय २१ वर्ष रा वरची आळी, बालमित्र मंडळाजवळ, सुसगाव), याला अटक केली. त्यांची तपासणी केली असता त्याच्या जवळील निळ्या रंगाच्या बँग मध्ये ६० हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. त्यानं तो कामास असलेल्या व्यंकटेशपार्क, को ऑप सोसायटीसमोर, सुतारवाडी, लिंकरोड, पाषाण, पुणे येथील ऑटो कस्टम स्टुडीओ टु व्हिलर नावाचे गॅरेजमध्ये आणखी तीन पिस्टल व काही जिवंत काडतुसे लपवून ठेवली असल्याचे सांगितल्याने त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी २ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

IPL_Entry_Point

विभाग