मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Lonavala Railwayblock : पुणे-लोणावळा मार्गावर आज रेल्वेचा मेगा ब्लॉक! ‘या’ लोकल रद्द, वाचा

Pune Lonavala Railwayblock : पुणे-लोणावळा मार्गावर आज रेल्वेचा मेगा ब्लॉक! ‘या’ लोकल रद्द, वाचा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 04, 2024 06:32 AM IST

Pune Lonavala Railwayblock : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता आज रविवारी (दि ४) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

 Mega Block
Mega Block

Pune Lonavala Railwayblock : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता आज रविवारी (दि ४) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही उपनगरी लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या उशिरा धावणार आहेत.

World Cancer Day 2024: उपचारासाठी आलेल्या कर्करोगाच्या रुग्णांनापुढे मुंबईत राहण्याचे आव्हान!

अप उपनगरीय गाड्या रद्द :-

१. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक रद्द करण्यात आली आहे.

२. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

३.शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी १२.०वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

४. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

५. शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

६. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

८. शिवाजीनगरवरून लोणावळ्याला सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

रामलीला नाटकात आक्षेपार्ह दृश्य आणि संवाद; पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना अटक

डाऊन उपनगरीय गाड्या रद्द :-

१. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

२.लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सकाळी ११.३० वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

३. लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

४. तळेगावहून पुण्यासाठी दुपारी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

५. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

७. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

८. लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशिराने धावणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

WhatsApp channel