मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Drug racket : तुरुंगात असतानाच ड्रग्स बनवायला शिकला; तस्कर ललित पाटील असं चालवायचा रॅकेट

Pune Drug racket : तुरुंगात असतानाच ड्रग्स बनवायला शिकला; तस्कर ललित पाटील असं चालवायचा रॅकेट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 13, 2023 09:53 AM IST

Pune Drug racket : ड्रग्स तस्कर ललित पाटील याला २०२०मध्ये अटक करण्यात आली होती. यावेळी येरवडा कारागृहात असतांना एका नाजेरीयन आरोपीकडून त्याने ड्रग्स तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने ड्रग्स तस्करीचे रॅकेट तयार केले.

Pune Drug racket
Pune Drug racket

पुणे: पुण्यात ससुन रुग्णालयात तब्बल अडीच कोटींचे ड्रग्स पडकल्यावर ड्रग्स माफिया लतील पाटीलचा भंडाफोड झाला. या घटनेनंतर ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून गेल्या दोन आठवड्यापसून ड्रग्स तस्करीचे हे प्रकरण राज्याच्यात चांगलेच गाजत आहे. दरम्यान, याचा मास्टर माइंड असलेल्या ललित पाटील याने येरवडा कारागृहात असतांनाच ड्रग्स तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन दोन वर्षात तस्करीचे मोठे जाळे उभरल्याचे तपासात उघड झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Hamas Israel War: युद्धभूमीतून मायदेशी परतले २१२ भारतीय; इस्राइलमध्ये अडकले आणखी २० हजार भारतीय

ड्रग तस्कर ललित पाटील याला इतर २२ जणांना चाकण पोलीस ठाण्यातील गुन्हयात डिसेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून तो कारागृहात होता. दरम्यान, त्याने कारागृहातील एका नायजेरियन तरुणाच्या मदतीने मेफेड्रोन ड्रग्स तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्याने केवळ दहा ते बारा दिवसात १३२ किलो मेफेड्रोन तयार केले होते. ललित पाटील याने यानंतर कारागृहातूनच ड्रग्स तस्करीचे रॅकेट तयार केले. या साठी तो ससुन रुग्णालयात आजारपणाच्या नावाखाली थांबला होता. या काळात त्याने अनेक अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन करून आपला व्यवसाय वाढवल्याची माहिती आहे.

Maharashtra Weather update : ऑक्टोबर हिटपासून मिळणार दिलासा; चक्रिय स्थितीमुळे पावसाची शक्यता

यामुळेच येरवडा जेल प्रशासन, ससुनचे अधिकारी पोलिस अधिकारी अडचणीत आले आहे. ललित पाटील ने त्याच्या भाऊ भूषण पाटील याच्या सोबत नाशिक येथे थेट ड्रग्स तयार करण्याचा कारखानाच उभारला. येथूनच तब्बल दोन कोटी १४ लाख रुपयांचे ड्रग्स पुण्यात ससुन रुग्णालयासमोर विक्रीसाठी आणले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी चाकण परिसरात ७ ऑक्टोबर रोजी कारवाई करुन रांजणगाव येथील अशोक संकपाळच्या ‘संयोग बायाटेक’ कंपनीत बनवलेले २० किलो मेफेड्रोन जप्त केले. संकपाळ याची रांजणगाव येथील संबंधित कंपनी बंद पडलेली होती. मात्र, याच कंपनीतून गुन्हयातील मुख्य आरोपी तुषार काळे याने त्याला कंपनी चालविण्यास द्या मेफेड्रोन तयार करून किलोमागे दोन लाख रुपये देण्याचे आमिष दिले होते. त्यानुसार तुषार काळे, राकेश खानिवडेकर, जुबेर मुल्ला, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा या आरोपींनी तब्बल १३२ किलो मेफेड्रोन तयार केले. मुळ शिरुरचा असलेल्या आणि नालासोपारा येथील रासायनिक द्रव्य विक्रेता किरण राजगुरु याने कच्चा मालाचा पुरवठा केला. १३२ किलो मेफेड्रोन निर्मितीनंतर १ कोटी ३० लाख रुपये तुषार काळे हा संकपाळ याल देणार होता. परंतु त्याने त्यापैकी केवळ ६. ५७ लाख रुपये दिले व उर्वरित पैसे दिले नाही. मात्र, उत्पादन घेतलेल्या १३२ किलो पैकी ११२ किलो मेफेड्रोन तुषार काळे याने मुळचा नायजेरियन आरोपी जुबी उडोका याला विक्री केले. पुढे जुबीने त्याचे नेटवर्कचा वापर करुन त्याची विक्री केली.

कायदेशीर मदतीमुळे ललित पाटील संर्पकात

पोलीस तपासात रांजणगाव येथील कंपनीतील ड्रग उत्पादनाचे पुरावे पोलीसांना मिळाल्यानंतर सखोल चौकशीत महाडचे कंपनीचे ड्रग उत्पादन उघडकीस आले. परंतु त्यापूर्वी इगतपुरी येथील एका ड्रग केस मध्ये आरोपी अरविंद लोहारे व इतर तीन ते चार जणांना कायदेशीर मदत देऊन जामीन करुन बाहेर काढण्याचे काम ललित पाटील व त्याच्या एका महीला वकीलाने केले. त्याबदल्यात पाटील याने सुरुवातीला पैसे घेतले. परंतु नंतर लोहरे याच्याकडून ड्रग घेऊन त्याची पुढे विक्री करण्यास सुरुवात केली. पाटील याचेकडील तपासत त्याच्याकडून २५ लाख तर तुषार काळे व राकेश खानविडेकर यांच्या घराचे छाप्यात ८५ लाख रुपये जप्त केले. पुढे ललित पाटील हा संबंधित आरोपिंच्या संर्पकात येऊन त्याने नियमित कायदेशीर मदत करण्यास सुरुवात केली.

IPL_Entry_Point

विभाग