मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार थेट पोहोचले रुग्णालयात

Sharad Pawar : गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार थेट पोहोचले रुग्णालयात

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 26, 2022 01:54 PM IST

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Sharad Pawar - Girish Bapat
Sharad Pawar - Girish Bapat

Sharad Pawar meets Girish Bapat : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली.

ट्रेंडिंग न्यूज

गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवार यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे हेही त्यावेळी पवारांसोबत होते.

गिरीश बापट हे भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत. पुण्यातील राजकारणात त्यांचं चांगलं वजन आहे. सर्वच पक्षीयांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असतानाही बापट यांनी येथील राजकारणात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शरद पवार यांच्याशी असलेल्या मधुर संबंधांमुळंच हे शक्य झाल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात होत असते. गिरीश बापट हे संधी मिळेल तेव्हा शरद पवार यांच्या कार्याचं कौतुक करतात.

IPL_Entry_Point

विभाग