मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik MLC Election : तांबे पिता-पुत्रांनी असं का केलं?; नाना पटोलेंनाही माहीत नाही!

Nashik MLC Election : तांबे पिता-पुत्रांनी असं का केलं?; नाना पटोलेंनाही माहीत नाही!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 12, 2023 05:58 PM IST

Nana Patole on Sudhir Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अचानक माघार घेतल्यानं काँग्रेसची अडचण झाली आहे.

Nana Patole - Satyajeet Tambe - Sudhir Tambe
Nana Patole - Satyajeet Tambe - Sudhir Tambe

Nana Patole on Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षानं अधिकृत एबी फॉर्म देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेतल्यानं काँग्रेसची नाचक्की झाली आहे. त्यांच्या ऐवजी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. हे सगळं कसं आणि का झालं याची माहिती खुद्द काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही नसल्याचं समोर आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी पक्षानं तिकीट देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळं काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच या निवडणुकीत उरलेला नाही. दुसरीकडं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. या संपूर्ण घडामोडींबाबत नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.

उमेदवारी मागे घेण्याबाबत, दुसऱ्या व्यक्तीनं उमेदवारी दाखल करण्याबाबत माझ्याशी कोणीही कसलीही चर्चा केलेली नाही. जे काही मला समजलं आहे, ते मीडियातून समजलं आहे. मी याबाबत माहिती घेऊनच बोलेन, असं नाना पटोले म्हणाले. माघार घेण्याच्या आधी आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाल्याचं समजतं. त्यामुळं मी त्यांच्याशीही चर्चा करणार आहे, असं पटोले म्हणाले.

भाजपनं घरफोडीचा नवा व्यवसाय सुरू केलाय!

सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही तात्काळ देऊ, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. त्याबाबत विचारलं असता पटोले यांनी भाजपचा समाचार घेतला. 'भाजपनं भय दाखवून घरं फोडण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. त्यामुळं त्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी, ही गोष्ट वेगळी. पण ते लोकशाहीचा चुथडा करायला निघालं आहे हे दिसतंय,' असं नाना पटोले म्हणाले.

 

IPL_Entry_Point