मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kutta Pills Addiction: नाशिकमध्ये कुत्ता गोळीमुळं तरुणाई झिंगली; पोलिसांकडून आरोपींवर कारवाईचा इशारा

Kutta Pills Addiction: नाशिकमध्ये कुत्ता गोळीमुळं तरुणाई झिंगली; पोलिसांकडून आरोपींवर कारवाईचा इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 10, 2023 10:27 AM IST

Kutta Pills For Addiction : उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये नशेसाठी तरुणाई कुत्ता गोळीचं सेवन करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशीला सुरुवात केली आहे.

Malegaon Nashik Crime News Marathi
Malegaon Nashik Crime News Marathi (HT)

Malegaon Nashik Crime News Marathi : दारू आणि ड्रग्जच्या तुलनेत स्वस्तात मिळणाऱ्या कुत्ता गोळी या उत्तेजक गोळीचं तरुणांकडून सेवन केलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात अनेक मेडिकल्समध्ये कुत्ता गोळी सर्रासपणे विकली जात असल्यानं त्याविरोधात शहरातील सामाजिक संघटना आक्रमक झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं शहरातील अनेक भागांमधील मेडिकल्समध्ये छापेमारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगावात गेल्या काही दिवसांपासून तरुणाई नशेसाठी कुत्ता गोळीचं मोठ्या प्रमाणात सेवन करत असल्यामुळं शहरातील सामाजिक संघटनांनी त्याविरोधात जनजागृती करायला सुरुवात केली आहे. दारू आणि ड्रग्जच्या तुलनेत कमी पैशांत मिळणारी ही गोळी अनेक मेडिकल्समध्ये मिळत असल्यामुळं पोलिसांनीही याविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून कुत्ता गोळीची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय आरोपी औषधविक्रेत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी मालेगावातील मदनीनगरमध्ये कुत्ता गोळीची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या आरोपीच्या घरावर छापेमारी केली होती. त्यावेळी १० हजारांहून अधिक किंमतीच्या कुत्ता गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता तरुणाईला कुत्ता गोळीच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी शहरातील सामाजिक संघटनांनी पोलिसांच्या सहकार्यानं शहरात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. याशिवाय कुत्ता गोळीच्या विक्रीसंदर्भात माहिती देण्यासाठी पोलिसांनी ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग