Joshimath Sinking Live Updates : उत्तराखंडमधील जोशीमठ या शहरातील तब्बल ५०० घरांना तडे गेल्याची आणि रस्ते, इमारती जमिनीत धसत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं भूस्खलनाच्या भीतीनं स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येनं जोशीमठमधून दुसऱ्या शहरात स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळं आता शहरातील परिस्थिती लक्षात घेता चमोली जिल्हा प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. प्रसिद्ध धार्मिकस्थळ असलेल्या बद्रीनाथला जाण्यासाठी भाविक जोशीमठातूनच जातात. जमिनीला तडे गेल्यामुळं शहर मातीत गाडलं जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिसरात सुरू असलेल्या वीजनिर्मिती प्रकल्प, बोगद्याची निर्मिती आणि टोलेजंग इमारतींच्या कामांमुळंच भूस्खलन होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.