मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Winter Session : अधिवेशनात कामकाज होणार की नाही?; दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही सभात्यागाने

Nagpur Winter Session : अधिवेशनात कामकाज होणार की नाही?; दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही सभात्यागाने

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 26, 2022 11:54 AM IST

Nagpur Winter Session : जयंत पाटील यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज सभात्याग केला.

Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly Session

Maharashtra Assembly Winter Session 2022 : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनचा दुसरा आठवडा आज सुरू झाला. पहिल्या आठवड्यात आरोप-प्रत्यारोप, निलंबन आणि सभात्यागामुळं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. दुसऱ्या आठवड्यातही हेच चित्र असल्यामुळं कामकाज होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांचा कथित भूखंड घोटाळा, महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न असे मुद्दे विरोधकांनी पहिल्याच दिवसापासून लावून धरले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य व माजी मंत्री जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आल्यानं सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. सीमा प्रश्नावर ठराव घ्यावा व जयंत पाटील यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी विरोधकांची मागणी आहे. ती मान्य होत नसल्यानं महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आज सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा अशी मागणी केली, मात्र ती मागणी मान्य करण्यात आली नाही. शिवाय आमदार जयंत पाटील यांचे निलंबनही मागे घ्यावे अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असल्यानं निर्णय घेता येणार नाही, अशी माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानं महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत व सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून सभात्याग केला.

IPL_Entry_Point