मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महिला दिनीच पतीने डोक्यावर हातोड्याने वार करून पत्नीला संपवलं, नागपुरातील घटना

महिला दिनीच पतीने डोक्यावर हातोड्याने वार करून पत्नीला संपवलं, नागपुरातील घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 08, 2023 09:15 PM IST

Husband murder his wife : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची डोक्यावर हातोड्याने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. महिला दिनीच ही हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर – बुधवारी (८ मार्च) जागतिक महिला दिन जगभरात उत्साहात साजरा केला जात असताना पुणे व नागपुरात दोन महिलांच्या हत्येने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने समोर आला आहे. पुण्यात महिला दिना दिवशीच सासूने सुनेची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर नागपुरात पतीने पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ही घटना नागपुरातील कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमाता नगरमध्ये घडली. अमर भारद्वाज असे आरोपीचे नाव असून ललिता (वय ४० ) असे मृत महिलेचे नाव आहे. अमरने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार करत तिची हत्या केली आहे. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, महिला दिना दिवशीच महिलेची हत्या झाल्याने नागपूर शहरात खळबळ माजली आहे. 

पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनेला घरकाम जमत नसल्याने सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केला. ही घटना पुण्यातील लोहगाव परिसरात घडली असून विमानतळ पोलिसांनी आरोपी सासुला अटक केली आहे.

रितू रवींद्र माळवी (वय २८, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या सुनेचे नाव आहे. तर कमला प्रभुलाल माळवी (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक समु चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग