मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर (Mumbai-Pune Highway) कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूरजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. संदीप दिलीप बर्वे (वय ४८ वर्षे) असं मृत कार चालकाचे नाव असून ते डोंबिवलीचे रहिवासी आहेत. जखमींमध्ये एका महिलेसह सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघात सुमन बर्वे (वय ६८ वर्ष) यांची प्रकृती गंभीर आहे. अश्वजीत बर्वे (वय १३ वर्ष), प्रणव बर्वे (वय ५ वर्ष), आदेश बर्वे (वय ३ वर्ष), अनिकेत बर्वे (वय १९ वर्ष), प्रिया बर्वे (वय १८ वर्ष), गौरव बर्वे (वय १७ वर्ष), कियारा बर्वे (वय ६ महिने) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना कामोठ्यातील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. रस्त्याच्या डाव्या बाजुची रेलिंग तोडून कार रस्त्याच्या खाली पलटली. ज्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकून खाली कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु होती. घटनास्थळी स्थानिक पोलीस, देवदुत टीम, आयआरबी कंपनीचा स्टाफ, इतर वाहन चालक उपस्थित होते.
नाशिक येथे मुंबई आग्रा मार्गावरील राउड घाटात आज सकाळी १०च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने बस ट्रकला धडकली असून या अपघातात १० जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धडक एवढी भीषण होती की संपूर्ण बसचे अर्ध्यातून दोन तुकडे झाले आहेत. सध्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा अपघात नाशिक जिल्ह्यातील चांदवड जववलीन राऊड घाटात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात बसचा टायर फुटल्याने झाला असल्याची माहिती आहे. राहुड घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले आहे.