मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Train Accident : मुंबईच्या 'लाईफ लाईन'ने घेतला दोघांचा बळी; डोंबिवलीतील तरुण तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

Mumbai Train Accident : मुंबईच्या 'लाईफ लाईन'ने घेतला दोघांचा बळी; डोंबिवलीतील तरुण तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 30, 2024 08:37 AM IST

Mumbai Train Accident : मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. यात एका तरुणाचा आणि तरुणीचा समावेश आहे. हे दोघेही लोकलच्या दरवाज्यात उभे होते. गाडीत गर्दी असल्याने त्यांचा तोल गेल्याने या घटना घडल्या.

मुंबईच्या 'लाईफ लाईन'ने घेतला दोघांचा बळी; डोंबिवलीतील तरुण तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू
मुंबईच्या 'लाईफ लाईन'ने घेतला दोघांचा बळी; डोंबिवलीतील तरुण तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू (HT)

Mumbai Train Accident : मुंबईची लाईफ लाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गर्दीने गेल्या दोन दिवसांत दोघांचा बळी घेतला आहे. यात एका तरुणाचा आणि तरुणीचा समावेश आहे. लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे दोघेही दरवाज्यात लटकून प्रवास करत होते. मात्र, त्यांचा तोल गेल्याने खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. मृत दोघेही डोंबिवली येथील आहे. ही घटना डोंबिवली ते घाटकोपर आणि दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान घडली.

ट्रेंडिंग न्यूज

PM Modi Maharashtra Daura : पंतप्रधान मोदींची आज म्हाडा, लातूर, धाराशीवमध्ये होणार सभा; शिंदे, फडणवीस लावणार हजेरी

मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या गर्दीने दोन जणांचा जीव घेतला आहे. दरवाज्यातून पडून दोन दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान हे दोन्ही अपघात घडलेले आहेत. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे हे दोघं दरवाजाला लटकून प्रवास करत होते, त्यावेळी तोल गेल्यामुळे दोघं खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

Viral News : लग्नपत्रिकेवर मोदींचे नाव लिहिणे वराला पडले महागात! अक्षता पडण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने केली 'ही' कारवाई

रिया श्यामजी राजगोर (वय २६), अवधेश दुबे असे मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही घटना सोमवारी घडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिया ही ठाण्यातील एका बांधकाम कंपनीत कामाला होती. ती सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान प्रवास करत होती. तिने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल ट्रेन पकडली होती. या लोकलमध्ये मोठी गर्दी होती. त्यामुळे रियाला आत जाता आले नाही. यामुळे ती दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागला. डोंबिवली स्टेशन गेल्यावर काही अंतरावर तिचा तोल गेला. यामुळे ती गाडीतून खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेची लाट! मुंबई ठाण्यासह मराठवाड्यात हीट वेव्हचा तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

तर दुसऱ्या घटनेत अवदेश दुबे हा दिवा-मुंब्रा लोकलने प्रवास करत होता. या गाडीत देखील मोठी गर्दी होती. त्यामुळे नाईलाजाने त्याला लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागला. तयाची गाडी ही मुंब्रा खाडीवरून जात असतांना त्याचा तोल गेला. यामुळे त्याचा खाडीमध्ये पडून मृत्यू झाला. अवधेशच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अवदेशची ऑफिसची बॅग नअसल्याने कुटुंबीयांनी हा आरोप केला आहे.

लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. या लोकलला मोठी गर्दी असते. यामुळे अनेक प्रवासी धोकादायकरित्या दरवाज्यात लटकून प्रवास करत असतात. हा प्रवास अनेकांच्या जिवावर बेतत आहे. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने लोकलची संख्या वाढवली असली तरी गर्दी मात्र कमी झाली नाही. यामुळे गेल्या वर्षभरात ४०० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू लोकलमधून पडून झाला आहे तर ८०० पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत.

IPL_Entry_Point