Mumbai Metro: वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ चा (Versova-Andheri-Ghatkopar Metro 1) वापर करणाऱ्या ४ लाख प्रवाशांना लवकरच तिकिटाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. निवडणुकीच्या काळात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (Mumbai Metro) नवीन प्रकारच्या तिकीट प्रणालीचे उद्घाटन केले आहे. आता फक्त क्यूआर-कोडेड रिस्टबँड (TapTap wristband) (मनगटी बँड) स्कॅन करून मेट्रो १ मधून प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील घाटकोपर, अंधेरी वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅनची सुद्धा गरज भासणार नाही. मुंबई मेट्रो १ ने बुधवारी (१० एप्रिल)नवीन तिकीट पर्याय म्हणून टॅपटॅप रिस्टबँड सादर केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना विनाअडथळा प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल. टॅपटॅप रिस्टबँड स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे.
अधिकाऱ्यांचा दावा आहे की, टॅपटॅप बॅटरीशिवाय कार्य करेल, वापरकर्त्यांना आवश्यकतेनुसार पैसे लोड करण्याची परवानगी देईल, टॅपटॅप रिस्टबँड वॉटरप्रूफ असेल. तसेच हे नॉन-एलर्जीक असेल, ज्याची किंमत २०० रुपये असेल, अशी माहिती मेट्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मेट्रो १ च्या सर्व स्थानकावरून टॅपटॅप रिस्टबँडची खरेदी करता येणार आहे. हे बँड घड्याळाप्रमाणेच आहे.मेट्रोतून प्रवास करताना हा बँड स्कॅन करून आता प्रवास करता येणार आहे. टॉकअप करण्याची सुविधा असणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने टॅप अँड गो ही प्रणाली सुरू केली. वन पुणे कार्ड संपर्करहित तंत्रज्ञानाचा वापर करून जलद आणि सुरळीत व्यवहार प्रक्रियेची हमी देते. वन पुणे कार्ड वापरून प्रवासी सोयीस्करपणे मेट्रो तिकिटांसाठी पैसे देऊ शकतात. कार्डचा वापर ऑनलाइन आणि स्टोअरमध्ये अशा दोन्ही प्रकारच्या किरकोळ खरेदीसाठी केला जाऊ शकतो. हे कार्ड मिळवण्यासाठीप्रवाशी मेट्रो स्टेशनला किंवा https://t.co/8zQXg7IRkx या लिंकवर भेट देऊ शकतात.
संबंधित बातम्या