Maharashtra weather update: विदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात पारा ४० शी पार गेला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. २८ तारखेनंतर राज्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यावर कोणतेही खास हवामांची यंत्रणा नाही. साउथ इंटेरियर कर्नाटका ते विदर्भावर असलेली द्रोणीका रेषा किंवा हवेची विसंगती अजून कायम आहे. त्यामुळे उत्तर-पूर्व वारे गुजरात वरून जाऊन राज्यात विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात आद्रते सोबत गरम हवा घेऊन येत आहे. अजून एक पश्चिमी विक्षोभ २९ मार्च पर्यंत उत्तर भारतावर प्रभाव करणार आहे. त्यामुळे राज्याच्या उत्तरी मध्य भागात २८, २९ आणि ३० मार्च दरम्यान आद्रततेत वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्याचे हवामान कोरडे राहील. २८ नंतर ढगाळ हवामान वाढण्याची शक्यता आहे. २९ ते ३० मार्चला राज्याच्या उत्तरी मध्य भागात वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ३१ मार्च नंतर ढगाळ हवामान कमी होईल. २७ ते ३० मार्च पर्यंत तापमानात वाढ होणार आहे. राज्याच्या उत्तरी मध्य भागात २८ ते ३० मार्चच्या दरम्यान हळूहळू आद्रतेत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे हवामान बदलणार नाही. २८ तारखेनंतर हळूहळू वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. २७ ते ३० मार्चपर्यंत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरातील तीन ते चार दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. २८ मार्चला संध्याकाळ नंतर ढगाळ वातावरणात वाढ होईल. तर २८ ते ३० मार्चच्या दरम्यान पण एक ते दोन डिग्रीने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ३१ मार्च नंतर ढगाळ वातावरणात घट होईल. तर अंशतः ढगाळ वातावरणात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात सोमवारी वर्धा जिल्ह्याचे तापमानात सर्वाधिक होते. विदर्भात तापमान ४०.८ डिग्री सेल्सिअस तर अकोला अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात तापमान ४०.१ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. सोलापूर येथेही तापमान ४० डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले.
मुंबईच्यात तापमानात थोडी घट झाली मुंबईचे तापमान ३१ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. तर पुण्यात देखील तापमान सोमवारी ३८.८ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले.