मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs PBKS : महिपाल लोमरोरचा इम्पॅक्ट आणि कार्तिकचा फिनीशिंग टच... आरसीबीचा पहिला विजय

RCB vs PBKS : महिपाल लोमरोरचा इम्पॅक्ट आणि कार्तिकचा फिनीशिंग टच... आरसीबीचा पहिला विजय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 25, 2024 11:20 PM IST

RCB vs PBKS ipl 2024 highlights : आयपीएल २०२४ मध्ये आज पंजाब आणि बंगळुरूचे संघ आमने सामने होते. या सामन्यात आरसीबीने पंजाबचा ४ विकेट्सनी पराभव केला.

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, 6th Match
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, 6th Match (AP)

RCB vs PBKS Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा सहावा सामना आज (२५ मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने शेवटच्या षटकात विजय मिळवला. आरसीबीचा यंदाचा हा पहिलाच विजय आहे. त्यांचा पहिला सामना सीएसकेविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात ते पराभूत झाले होते.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पंजाबने ६ बाद १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.२ षटकात ६ बाद १७८ धावा करत सामना जिंकला.

एकवेळ आरसीबी हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबी दबावात आली. त्यामुळे सामना शेवटच्या षटकात पोहोचला.

पण आरसीबीच्या ६ विकेट पडल्यानंतर आरसीबीने महिपाल लोमरोरला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीसाठी पाठवले. त्यांची ही युक्ती कामी आली. 

वास्तविक, १७७ धावांचा पाठलाग करताना आरसीबीने १५ षटकात ४ बाद १३० धावा केल्या होत्या. आरसीबी सहज जिंकेल वाटत होते. विराट आणि अनुज रावत यांच्या रुपाने आरसीबीच्या दोन विकेट एकापाठोपाठ गेल्या. त्यानंतर सामना पंजाबच्या बाजून झुकला.

परंतु महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांनी आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कार्तिकने १० चेंडूत २८ धावा करून नाबाद माघारी परतला.  लोमराने ८ चेंडूत १७ धावा केल्या. कार्तिकच्या बॅटमधून ३ चौकार आणि २ षटकार आले. तर लोमरोरने दोन चौकार आणि १ षटकार लगावला. 

त्याआधी विराट कोहलीने ४९ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.

पंजाबचा डाव

पंजाबकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शशांक सिंगने २०व्या षटकात एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर २१ धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीमुळेच पंजाबने १७० धावांचा आकडा ओलांडला होता. 

त्याआधी पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. सॅम करनने २३ आणि जितेश शर्माने २७ रन्सची इनिंग खेळली. अखेरीस शशांक सिंग ८ चेंडूत २१ धावा करून नाबाद परतला. तर आरसीबीतर्फे ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

IPL_Entry_Point