Railway mega block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान २९ मार्चला अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याने या बदलाची दाखल घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे गाडी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. पुणे रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. या दरम्यान, अनेक महत्वाची कामे केली जाणार असल्याने मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मेगाब्लॉक दरम्यान, २६ मार्चला पुणे -मिरज एक्स्प्रेस आणि मिरज-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे.
तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस २६ व २९ मार्चला सकाळी ८.१५ वाजता सुटण्याऐवजी सकाळी ९.४५ वाजता सोडण्यात येणार आहे. कोल्हापूर येथून सुटणारी कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस येथून २६ मार्चला सकाळी ९.१० वाजण्याऐवजी सकाळी १०.४५ वाजता सोडण्यात येणार आहे. तर, कोल्हापूर येथून सुटणारी कोल्हापूर-पुणे डेमू २७ ते २९ मार्चदरम्यान पहाटे ५ वाजण्याऐवजी ७ वाजता सोडण्यात येणार आहे.
तर मुंबईला जाणारी दादर-सातारा एक्स्प्रेस २५ मार्चला एका तास उशिरा धावणार आहे.
संबंधित बातम्या