Pune lonavla railway megablock: पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक!अनेक लोकल रद्द, तर काही उशिराने धावणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune lonavla railway megablock: पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक!अनेक लोकल रद्द, तर काही उशिराने धावणार

Pune lonavla railway megablock: पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक!अनेक लोकल रद्द, तर काही उशिराने धावणार

Mar 02, 2024 05:44 AM IST

Pune lonavla railway megablock on Sunday: मध्य रेल्वेच्या (central railway pune division) पुणे विभागाकडून रविवारी (दि ३) पुणे-लोणावळा (pune lonavala local train) मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.३) मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक
पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक (HT_PRINT)

Pune lonavla railway mega block on Sunday: मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (दि ३) मेगाब्लॉक (pune lonavala local train) घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.

BJP Leader Murder: नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आणखी एक भाजप नेता ठार; वर्षभरातील सातवी घटना

पुणे - लोणावळा -पुणे दरम्यान खालील लोकल गाड्या रद्द राहतील.

अप उपनगरीय गाड्या रद्द :-

१. पुण्याहून लोणावळा साठी ९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द राहील.

२. पुण्याहून लोणावळा साठी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द राहील.

३. शिवाजीनगरहून लोणावळा साठी १२.०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५९२ रद्द राहील.

४. पुण्याहून लोणावळा साठी ३ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द राहील.

५. शिवाजीनगरहून तळेगाव करीता ३.४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द राहील.

६. पुण्याहून लोणावळा साठी ४.२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द राहील.

७. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता ५.२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द राहील.

Couple Romancing On Bike: धावत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे; मग पोलिसांनी असा शिकवला धडा

लोणावळा, तळेगावहून डाऊन उपनगरीय रद्द लोकल

१. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १०.०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द राहील.

२.लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता ११.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५९१ रद्द राहील.

३. लोणावळ्याहून पुणे साठी २.५०वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१६५१ रद्द राहील.

४. तळेगाव येथून पुणे साठी ४.४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द राहील.

५. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता ५.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द राहील.

६. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी ६.०८वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द राहील.

७. लोणावळ्याहून पुण्यासाठी ७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द राहील.

विलंबाने धावणाऱ्या गाड्या :

एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस साडेतीन तास विलंबाने धावेल. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Whats_app_banner