Sharad Pawar Dinner Diplomacy: शरद पवारांचे भोजनाचे निमंत्रण एकनाथ शिंदेंनी नाकारलं; म्हणाले...-cm eknath shinde refused sharad pawar dinner invitation whats the reason ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar Dinner Diplomacy: शरद पवारांचे भोजनाचे निमंत्रण एकनाथ शिंदेंनी नाकारलं; म्हणाले...

Sharad Pawar Dinner Diplomacy: शरद पवारांचे भोजनाचे निमंत्रण एकनाथ शिंदेंनी नाकारलं; म्हणाले...

Mar 01, 2024 09:26 PM IST

Sharad Pawar Invites CM Eknath Shinde: शरद पवारांचे भोजनाचे निमंत्रण एकनाथ शिंदेंनी का नाकारले? यामागचे कारण समोर आले आहे.

CM Eknath Shinde On Sharad Pawar Invitation
CM Eknath Shinde On Sharad Pawar Invitation (HT_PRINT)

Sharad Pawar Dinner Diplomacy: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेवणाचे आमंत्रण दिले. यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही निमंत्रित करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भोजनाला उपस्थित राहण्यास नकार दिला. "आमचे उद्याचे व्यस्त वेळापत्रक आहे. आम्हाला अहमदाबादला जायचे आहे. पुढच्या वेळी आम्ही नक्की येऊ, आम्ही आमचा निरोप शरद पवारांना दिला आहे", असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या येथे भोजनाला जाण्यास नकार दिला. त्यांनी शरद पवारांना पत्र लिहून बारामतीत खूप व्यग्र असणार असल्याची माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, 'तुमचे पत्र मिळाले. मला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. अजितदादा पवार यांनी बारामतीत कार्यक्रम आयोजित केल्याचे तुम्हाला माहिती आहे. या कार्यक्रमामुळे आमचे वेळापत्रक व्यस्त आहे. यामुळे आम्हाला येणे शक्य नाही.

पुढे फडणवीस म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनीही व्यस्ततेचे कारण देत जेवणाला जाण्यास नकार दिला. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले होते. या निमंत्रणाची महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा रंगली आणि त्यामागे शरद पवारांची रणनीती काय आहे? हे जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता लागली होती."

 

बारामतीत अजित पवार चांगलेच आक्रमक असल्याचे मानले जात होते. त्यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत या जागेबाबत चर्चा व्हावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला असून सध्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे येथून खासदार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अजित पवार यांनी आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना निमंत्रण दिलेले नाही. अजित पवारांच्या कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत.