Couple Romancing On Bike: धावत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे; मग पोलिसांनी असा शिकवला धडा-ahmedabad couple romancing on bike detained by police after video goes viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Couple Romancing On Bike: धावत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे; मग पोलिसांनी असा शिकवला धडा

Couple Romancing On Bike: धावत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे; मग पोलिसांनी असा शिकवला धडा

Mar 01, 2024 10:35 PM IST

Couple Romancing Video: स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालून धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Ahmedabad Couple romancing on Bike
Ahmedabad Couple romancing on Bike

Couple Romancing On Bike: गुजरातच्या अहमदाबाद येथे धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे तरुणाची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

विवेक रागवानी (वय, २१) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो वाहतूक नियमांचे उल्लंघन करत धावत्या बाईकमध्ये एका तरुणीशी अश्लील चाळे करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२४ चा आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात धावत्या दुचाकीवर तरुणीसोबत अश्लील चाळे करीत आहे. त्यावेळी दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आरोपी हा दुचाकीने निकोल रिंगरोडवरून जात होता.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत त्याला ताब्यात घेतले. मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७, १८१, १८४, ११० आणि ११७ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

Jnu clashes video viral : जेएनयूमध्ये मध्यरात्री राडा! ABVP आणि डाव्या संघटनांमध्ये तुफान हाणामारी

यापूर्वी सोशल मीडियावर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राजस्थानच्या जयपूरमध्ये असाच प्रकार घडला होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून धावत्या दुचाकीवर एका जोडप्याचे चुंबन घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर जयपूर पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वारचे चालान कापले होते.या व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित तरुण भररस्त्यात धावत्या दुचाकीवर त्याच्या मागे बसलेल्या तरुणीचे चुंबन घेत होता.

विभाग