BJP Leader Murder: नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आणखी एक भाजप नेता ठार; वर्षभरातील सातवी घटना-naxalites kills bjp leader tirupati katla in chhattisgarh bijapur district ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BJP Leader Murder: नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आणखी एक भाजप नेता ठार; वर्षभरातील सातवी घटना

BJP Leader Murder: नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आणखी एक भाजप नेता ठार; वर्षभरातील सातवी घटना

Mar 01, 2024 11:29 PM IST

Naxalites Kills BJP Leader: छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची हत्या केली.

Naxalites Kills BJP Leader
Naxalites Kills BJP Leader

BJP Leader Murder: छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची हत्या केली. पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जनपद पंचायतीचे सदस्य तिरुपती कटला यांची धारदार शस्त्राने हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कटला एका लग्न समारंभासाठी गेले असताना टॉयनार गावात रात्री आठच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला.

प्राथमिक माहितीनुसार, कटला हे एका लग्न समारंभातून बाहेर आल्यावर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्यांना तातडीने विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या केल्याची गेल्या वर्षभरात ही सातवी घटना आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नारायणपूर जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची झारघाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ील बाजारपेठेत धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी दुबे प्रचार करत होते.

गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी मोहला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यातील सरखेडा गावात संशयित माओवाद्यांनी भाजप कार्यकर्ते बिरजू तारम यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. जून महिन्यात संशयित माओवाद्यांनी विजापूर जिल्ह्यात भाजपच्या एका स्थानिक नेत्याची हत्या केली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमहिन्यात बस्तर विभागात वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या घटनांमध्ये भाजपच्या तीन नेत्यांची हत्या करण्यात आली होती.

मागील काँग्रेस सरकारच्या काळात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या हत्येला टार्गेट किलिंग म्हटले होते आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती.

विभाग