Maharashtra Weather Update : राज्यावर सूर्य आग ओकत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानात ४० च्या पुढे गेले आहे. राज्यात अकोला पुन्हा सर्वाधिक हॉट ठरले आहे. बुधवारी अकोल्यात ४२.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या सोबतच मालेगाव ४२ डिग्री सेल्सिअस, जळगाव ४१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात वाढत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ३१ तारखेला अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात वीजांचा कटकडाट, मेघ गर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यावर राज्यावर हवामानाची कोणतीही यंत्रणा नाही. मात्र, एक द्रोणीय रेषा ही दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भावर आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर असणाऱ्या प्रतीचक्रवातामुळे राज्यात आद्रता वाढत आहे. याचा परिमाण राज्याच्या हवामानावर होत आहे. २७ ते २९ मार्च दरम्यान, राज्यात मराठवाडा आणि विदर्भात वाढलेल्या आद्रतेमुळे कमाल तापमानात वाढ होणार आहे. कोकण आणि गोव्यातही वतावरण उष्ण आणि दमट राहील.
३० तारखेला मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात वीजांचा कटकडाट, मेघ गर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात पुढील दोन ते तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. ३० आणि १ तारखेला निरभ्र आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर ३१ तारखेला आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात बुधवारी ३९ डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर, २०.५ एवढे किमान तापमान होते.
पुणे 39.5, लोहगाव 39.6, अहमदनगर 39.8, जळगाव 41.8, कोल्हापुर 38.1, महाबळेश्वर 32.1, मालेगाव 42.0, नाशिक 39.4, सांगली 38.5, सातारा 39.1, सोलापुर 41.3, मुंबई 31.4, सांताक्रूज 32.0, अलिबाग 31.6, रत्नागिरी 32.2, पणजी 33.2 डहाणू 33.3, औरंगाबाद 39.2, परभणी 41.2, नांदेड 40.2, बीड 40.1, अकोला 42.8, अमरावती 41.2, बुलढाणा 41.0, चंद्रपुर 39.0, गोंदिया 37.6, नागपुर 39.0, वर्धा 40.5