मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Khadse : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार

Eknath Khadse : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 06, 2024 06:10 PM IST

Eknath Khadse Join Bjp : लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपमध्ये परतणार आहेत. ही माहिती स्वत: खडसे यांनीच दिली आहे.

 एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार
 एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होणार असून एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतणार आहेत. आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आज सायकाळपर्यंत खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित केला जाणार आहे. खडसे यांचे राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये परत जाणे शरद पवार गटासाठी लोकसभेच्या तोंडावर मोठा धक्का मानले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र एकनाख खडसे यांनी या वृत्ताला फेटाळत सध्या भाजपमध्ये जाण्याचा विचार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वत:च आपण भाजपमध्ये जात असल्याचं म्हटले आहे. खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार, हे शनिवारी सायंकाळपर्यंत निश्चित होणार आहे. काही महिन्यापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या खडसेंचे शरद पवारांनी विधानपरिषद आमदारकी देऊन राजकीय पुनर्वसन केले होते.

महाराष्ट्र भाजपमध्ये (Maharashtra Bjp)  एकनाथ खडसे यांचे मोठं वर्चस्व होतं. मात्र राज्यातील भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर खडसे यांची पक्षातील ताकद कमी होत गेली व ते अडगळीत गेले. दाऊदशी फोनवरून संवाद साधल्याच्या प्रकरणात त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देऊन विजनवासात जावे लागले होते. त्यानंतर फडणवीस व त्यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्यावर त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत आल्यानंतर शरद पवारांनी खडसेंनी विधानपरिषदेची उमेदवारी देत राजकीय पुनर्वसन केले होते.

गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा फास खडसे कुटुंबाभोवती आवळत चालला असल्याने खडसेंनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. एकनाथ खडसे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतल्याचे बोललो जात आहे. मात्र त्यांनी दिल्लीला कामानिमित्त गेल्याचे म्हटले होते. माझ्या एका केसची सर्वोच्च न्यायालयात तारीख असल्यामुळे आपण दिल्लीला गेल्याचे खडसे म्हणाले होते. तसेत दिल्लीला गेल्यावर नेत्यांच्या भेटी होतच असतात.

भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी तडजोडीचे राजकरण सुरू केले असून मागील काही महिन्यांपासून अनेक नेत्यांना सोबत घेतलं आहे. त्यातच आता उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे सोबत आल्याने जळगाव व रावेरमध्ये भाजपला फायदा होईल, असा भाजपचा कयास आहे. यामुळे खडसेंना भाजपात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रावेरमध्ये खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपकडून तर मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात आहेत.  खडसेंच्या पक्षप्रवेशाने रावेरमधील लढत लक्षवेधी होणार आहे.  

IPL_Entry_Point