Sonia Gandhi : मोदींकडून लोकशाही संपण्याचे काम, विरोधी नेत्यांना भाजपात येण्यासाठी धमक्या, सोनिया गांधींचा हल्लाबोल
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sonia Gandhi : मोदींकडून लोकशाही संपण्याचे काम, विरोधी नेत्यांना भाजपात येण्यासाठी धमक्या, सोनिया गांधींचा हल्लाबोल

Sonia Gandhi : मोदींकडून लोकशाही संपण्याचे काम, विरोधी नेत्यांना भाजपात येण्यासाठी धमक्या, सोनिया गांधींचा हल्लाबोल

Published Apr 06, 2024 05:11 PM IST

Sonia Gandhi : भाजपकडून विरोधा नेत्याने धमक्या दिल्या जात आहेत. भाजपात येण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.देश काही लोकांची खासगी संपत्ती नाही. देशापेक्षा मोठा कोणीही नाही.

जयपूर येथील रॅलीत संबोधित करताना सोनिया गांधी
जयपूर येथील रॅलीत संबोधित करताना सोनिया गांधी

Lok sabha elections 2024 : राजस्थानमधील जयपूर येथे प्रचार रॅलीला संबोधित करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi rally in jaipur) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी स्वत:ला महान समजत असून यामुळे देश व लोकशाही संकटात सापडली आहे.विरोधा नेत्यांनी भाजपात सामील होण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. आज लोकशाही संपल्यात जमा आहे. आपला देश संकटात आहे. आपले संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) भाजपला हल्लाबोल करतना म्हटले की, आम्ही हुकूमशाही प्रवृत्तीचा निकराने सामना करू. आज देशात महागाई दर सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. घरगुती गॅसचे वाढलेल्या दराने महिलांचे बजेट कोलमडले आहे.यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवारांना मते देण्याचे आव्हान करत जनतेला अनेक आश्वासने दिली. सोनिया गांधी म्हणाल्या की, इंडिया आघाडी सत्तेत आल्यास काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण केली जातील.

भाजपकडून विरोधा नेत्याने धमक्या दिल्या जात आहेत. भाजपात येण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.देश काही लोकांची खासगी संपत्ती नाही. देशापेक्षा मोठा कोणीही नाही. मात्र दुर्देवाने सध्या असे नेते सत्तेत आहेत, त्यांच्याकडून लोकशाही संपवण्याचे काम केले जात आहे. संविधानिक संस्थाना उद्वस्त केले जात आहे. देश हुकूमशाहीकडे झुकला आहे. याचा आम्ही सर्वमिळून विरोध करू.

आपला देश मागील १० वर्षापासून अशा सरकारच्या हवाली आहे, ज्यांनी बेरोजगारी, महागाई, आर्थिक संकट, असमानता आणि अत्याचारास प्रोत्साहन देण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. मोदी सरकारने काय-काय केले ते सर्व तुमच्या समोर आहे. यामुळे ही वेळ निराशेने भरलेली आहे. मात्र या निराशेतून नव्या आशेचा जन्म होईल.

प्रियंका गांधींचाही मोदींवर निशाणा -

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, जाहीरनाम्याला आम्ही न्याय पत्र नाव दिले आहे, त्यामुळे हे स्पष्ट आहे की, या केवळ घोषणांची यादी नाही जी निवडणुकीनंतर विसरली जाईल. ही एका संघर्षाचा आवाज आहे. या देशाचा आवाज आहे, जो आज न्याय मागत आहे. आज बेरोजगारी उच्च पातळीवर आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारने काय केले?...आश्वासने तर दिली मात्र ती पूर्ण केली नाहीत. अग्निवीर योजनेमुळे तरुणवर्गाच्या आशेवर पाणी फेरले. प्रत्येक राज्यात पेपर फुटीच्या घटना घडत आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, मात्र पंतप्रधानांना त्यांना भेटण्यास वेळ नाही.

तुमचे मत लोकशाही वाचवेल - प्रियंका

प्रियंका गांधी म्हणाल्या की, तुम्ही जे मत देणार आहात त्यामुळे लोकशाही वाचणार आहे. तुम्ही विचार करत असाल की, आपली लोकशाही संकटात कशी? असे यामुळे कारणलोकशाही मजबूत करण्यासाठी ज्या मोठ-मोठ्या संस्था निर्माण केल्या आहेत, त्यांना कमकुवत केले जात आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आज अशी स्थिती आहे की, लोकांचा ईव्हीएमवर विश्वास राहिलेला नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या