मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 01, 2024 10:50 PM IST

Marathwada Water Shortage : मराठवाड्यातील सात जिल्ह्यात तब्बल १४२४टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील सात जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा (संग्रहित छायाचित्र)
मराठवाड्यातील सात जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा (संग्रहित छायाचित्र)

Marathwada Water Shortage : एप्रिल महिन्यात उकाड्याने लाही लाही केल्यानंतर मे महिन्यातही उष्णता भाजून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा पाऊसमान सामान्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असला तरी राज्यातील जवळपास सर्वच धरणांतील व जलाशयातील जलसाठा कमालीचा घटला आहे. मराठवाड्यात पाणीटंचाईच्या समस्येने गंभीर रुप घेतले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यातील ७ जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील सात जिल्ह्यात तब्बल१४२४टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत. टँकरची सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असून येथे ५६९टँकरने पेयजल उपलब्ध केले जात आहे.

दोन वर्षापूर्वी म्हणजे २०२० ते २०२२ या तीन वर्षात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्व धरणातील व जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली होती. मात्र गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी पातळीवर मोठी घट झाली आहे. मे महिन्यातच जवळपास दीड हजार टँकरने पाणीपुरवठा केला जात असून महिन्याच्या अखेरच टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यात आहे. दरम्यान १४२४ हा आकडा सरकारी टँकरचा असून खाजगी टँकरही इतक्याच संख्येने पाण्याची विक्री करत असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील खालील जिल्ह्यात सुरू असलेले टँकर

संभाजी नगर –५६९

जालना -४१८

परभणी -५

नांदेड -१५

बीड-३०२

लातूर-१३

धाराशिवमध्ये – १०२

राज्यात सोलापूर सर्वात हॉट –

राज्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात सर्वाधिक तापमान सोलापुरात नोंदवले आहे. सोलापूरचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. जेऊरमध्ये तर ४४.५ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरातही नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. मुंबईचा पारा ३४.१ अंशांवर गेला असून मुंबई उपनगराचे तापमान ३८.४ अंश सेल्सिअसवर गेलं आहे.

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट -

पूर्व मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड राज्यातील काही भागात तसेच ओडिशा, पश्चिम बंगालच्या मैदानी भागात,झारखंड आणि बिहारसह अन्य भागात जवळपास २ ते ४ दिवस लू असू शकते.उत्तर मैदानी प्रदेश, मध्य भारतातील काही भागात ३ दिवस उष्णतेची लाट येऊ शकते. दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागात ५ ते ८ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग