मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 01, 2024 08:34 PM IST

Heat Wave Alert : वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना आता हवामान विभागाने मे महिन्यातही यातून दिलासा मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली आहे. देशातील अनेक राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट
महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

Weather Forecast : मार्च व एप्रिल महिन्यात देशातील अनेक राज्यामधील नागरिक उष्णतेच्या लाटेमुळे पुरते हैराण झाले असताना हवामान विभागाने पुन्हा तापमान वाढीचा इशारा दिला आहे. मे महिन्यातही नागरिकांना उकाड्यापासून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे दिसत आहेत. उकाड्यामध्ये अंगातून घामाच्या धारा निघत असताना आता हवामान खात्याने (Weather Department) देशातील ४ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात मे महिन्यात कमाल तापमान सरासरीहून अधिक राहण्याची शक्यता आहे. २ ते ४ दिवस लू (Heat wave) येऊ शकते.हवामान विभागाने सांगितले की, ईशान्य भारतातील अनेक भाग तसेच उत्तर पश्चिम भारत आणि मध्य भारतातील काही राज्यात कमाल तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे.

उत्तर पश्चिम भारताच्या काही भागात गंगेच्या खोऱ्यात,मध्य भारत आणि ईशान्य भारतातील काही सोडून देशातील बहुतांश भागातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात मे महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, गुजरातमध्ये मे महिन्यात आणखी पाच ते आठ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतातील एप्रिलमधील सरासरी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. हे तापमान १९०१ नंतरचे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रासह या राज्यात उणतेची लाट -
पूर्व मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड राज्यातील काही भागात तसेच ओडिशा, पश्चिम बंगालच्या मैदानी भागात,झारखंड आणि बिहारसह अन्य भागात जवळपास २ ते ४ दिवस लू असू शकते.

 

उत्तर मैदानी प्रदेश, मध्य भारतातील काही भागात ३ दिवस उष्णतेची लाट येऊ शकते. दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागात ५ ते ८ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point