मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Monsoon : उन्हात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी गारेगार बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा अंदाज

Maharashtra Monsoon : उन्हात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी गारेगार बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा अंदाज

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2024 05:02 PM IST

Maharashtra Monsoon : स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२४ मध्ये मान्सून सामान्य राहणार असून सरासरीइतका पाऊस पडणार आहे. मान्सूनची सरासरी १०२ टक्के(skymetrain forecast) राहण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा अंदाज
यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा अंदाज

Maharashtra monsoon update : मागच्या वर्षी मान्सून सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने  महाराष्ट्रासह देशातील बराचसा भाग दुष्काळात होरपळत आहेत. भारतातील नद्यांच्या परिस्थितीवरील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात देशातील महत्वाच्या नद्यांमध्ये केवळ ४० टक्केच पाणी शिल्लक असल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक नद्या कोरड्या ठाक मैदानासारख्या भासू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे विशेषत: मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. आता ऐन मार्चमध्येच पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या महाराष्ट्राला दिलासादायक वृत्त समोर आले आहे. (skymet rain  forecast monsoon  for  india in 2024)

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

हवामानाचे पूर्वानुमान वर्तवणारी संस्था स्कायमेटने (skymet monsoon prediction) मंगळवारी मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२४ मध्ये मान्सून सामान्य राहणार असून सरासरीइतका पाऊस पडणार आहे. मान्सूनची सरासरी १०२ टक्के   (५ टक्के  प्लस-मायनस मार्जिन) राहण्याची शक्यता आहे. 

दुष्काळासाठी कारणीभूत अल-निनोचा प्रभाव ओसरू लागला असून त्याची जागा ला-निना घेणार आहे. याचा फायदा भारतीय उपखंडाला होणार असून मान्सून वेळत दाखल होणार आहे. मात्र सुरुवातीला अल-निनोच्या एक्झिटचा परिणाम मान्सूनच्या आगमनावर जाणवणार आहे.

जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत ४ महिने असणाऱ्या मान्सून सीझनमध्ये पावसाची सरासरी (LPA) ८६८.६ मिमी आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह यांनी म्हटले की, सुरुवातीला मान्सूनच्या आगमनावर अल-निनोचा परिणाम जाणवणार आहे. मात्र मान्सूनच्या दुसऱ्या हाफमध्ये याची भरपाई होणार आहे. 

यावर्षी स्कायमेटने दुसऱ्यांदा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी १२ जानेवारी २०२४ रोजी स्कायमेटने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज जाहीर केला होता.

अल निनो ची जागा घेणार ला निना –

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अलनिनो खूप वेगाने ला निनामध्ये बदलत आहे. पावसासाठी हा चांगला संकेत आहे. अलनिनोचे रुंपातर ला नीनामध्ये होणे चांगल्या मान्सूनचे कारण ठरते. अल निनो ते ला निना परिवर्तनामुळे सीझनची सुरुवात विलंबाने होऊ शकते. मान्सूनच्या सीझनमध्ये वेगवेगळे व असमान पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच कोठे अधिक तर कोठे कमी पाऊस होऊ शकतो.  मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पुरेसा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

दरम्यान आयएमडीने उष्णतेच्या लाटांचे दिवस ८ ऐवजी १० केल्याने पुढील काही दिवस उष्णतेच्या झळा भाजून काढण्याची शक्यता आहे. 

IPL_Entry_Point