मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather update : राज्यावर अस्मानी संकट! विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; असे असेल हवामान

Maharashtra Weather update : राज्यावर अस्मानी संकट! विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; असे असेल हवामान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 09, 2024 06:43 AM IST

Maharashtra Weather update : राज्यात पुढील काही दिवस मराठवाडा विदर्भात गारपीट होण्याच्या अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही (IMD alert) जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 राज्यावर अस्मानी संकट! विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; असे असेल हवामान
राज्यावर अस्मानी संकट! विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; असे असेल हवामान (Shyamal Maitra)

Maharashtra Weather update : राज्यावर अस्मानी संकटाचे वादळ घोंघावू लागले आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. आज पासून पुढील काही दिवस विदर्भ मराठवाडा आणि राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोकं...', पंतप्रधान मोदींचं ठाकरेंच्या वर्मावर बोट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील पाच ते सात दिवस कोकण गोव्यात हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात आज हवामान कोरडे राहील. आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघकर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडात व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. ९ ते ११ दरम्यान कोकण वगळता उर्वरित राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या गडगटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या कमाल तापमानात १ ते २ डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दरम्यान राज्यात काही ठिकाणी उर्वरित राज्यात काही ठिकाणी मेघकर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे राज्याच्या कमाल तापमानात पुढील पाच दिवसात हळूहळू एक ते दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi : हेलिकॉप्टरचं इंधन संपलं अन् राहुल गांधींचं प्रचाराचं गणित बिघडलं, हॉटेलमध्येही सुरक्षा व्यवस्थेत चूक

विदर्भात असे असेल हवामान

हवमान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. चंद्रपूर, नागपूर, भंडारा व यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची व गारपिट होण्याच्या इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सूर्य आग ओकणाऱ्या विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. या सोबतच अकोला, अमरावती, जळगाव, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा उघडला दरवाजा, धडकल्याने बाइकस्वार कोसळला अन् ट्रकने चिरडले

पुण्यात ढगाळ हवामनसह पावसाची शक्यता

पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज बघूया आज आकाश अंशत: ढगाळ राहील. ९ आणि १० तारखेला आकाश मुख्यतः निरप्त राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे ११ आणि १२ तारखेला आकाश अंशत: ढगाळ राहुल हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहणार आहे.

मुंबईत हवामान कोरडे राहणार

मुंबई शहर व उपनगरांमध्ये पुढील २४ तास हवामान कोरडे राहणार आहे. आकाश निरभ्र राहणार आहे. तर कमाल तापमान ३४ डिग्री अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे. सोलापूरमध्ये सोमवारी कमाल तापमान हे ४२ अंश डिग्री सेल्सियस नोंदवले गेले.

IPL_Entry_Point