Maharashtra Weather Update : राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात, मराठवाड्यात तर पश्चिम महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नाशिक, धुळे, अहमदनगर, बीड, आणि जळगाव, नंदुरबार, जालनासह विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला असून बाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तापमानात वाढले आहे. विदर्भात अकोल्यात सर्वाधिक तापमानात नोंदवण्यात आले होते. मात्र, आता राज्यात काही ठिकाणी पावसाची आणि तीव्र उन्हाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज एक कमी दाबाची रेषा किंवा वाऱ्याची खंडितता उत्तर तमिळनाडू व नैऋत्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागातून कर्नाटक व मराठवाड्यावरून जात आहे त्यामुळे पुढे ४८ तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळ ठिकाणी ढगाळ वातावरणासहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्याच्या संपूर्ण भागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित सोसाट्याचा वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील ४८ तासात तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील ७२ तासात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
राज्यात विदर्भात उष्णतेची लाट आली आही. अकोला सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा ठरला आहे. शुक्रवारी देखील अकोल्यात ४२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक कमी तपमानाची नोंद झाली. महाबळेश्वरचे कीमान तापमान २० डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान ३१ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले.
संबंधित बातम्या