अजित पवारगटाला मोठा धक्का बसला आहे.पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लंके सुजय विखेंविरोधात मैदानात उतरणार आहेत.
पारनेरचे आमदार निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी ते शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याआधी शुक्रवारी दुपारीनिलेश लंके यांनी मतदारसंघात मेळावा घेतला होता.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर निलेश लंके म्हणाले की, मी मतदार संघातील जनतेची व अजित पवारांची माफी मागतो. जनतेने मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं होतं. मात्र आपल्याला लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार असल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे.
आमदारकीसाठी चार महिने शिल्लक असताना राजीना द्यावा लागत आहे. मात्र आज निर्णय घ्यायची वेळ आली आहे. आपण लढणारी औलाद आहे. केवळ माझ्या जवळचे होते म्हणून महसूल विभागातील ४७ कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या. कोणी काहीही म्हटले तरी यंदाची निवडणूक आपल्याला कमीत कमी २ लाखांच्या मताधिक्याने जिंकायची आहे. अहमदनगरमध्ये लंके विरुद्ध विखे असा राजकीय सामना रंगणार आहे.
संबंधित बातम्या