मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prakash Ambedkar : ..तरचं उद्धव ठाकरेंशी युती! प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Prakash Ambedkar : ..तरचं उद्धव ठाकरेंशी युती! प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 23, 2024 07:16 PM IST

Prakash Ambedkar on alliance with UBT: जर आमचं महाविकास आघाडी सोबत जमलं तरच उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती नाही तर आमचे मार्ग वेगवेगळे आहेत. असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार की नाही, याबाबत तळ्यात-मळ्यात सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना डेडलाईन देत प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, २६ मार्चपर्यंत महाआघाडीसोबत सकारात्कम चर्चा न झाल्यास वेगळी भूमिका जाहीर केली जाईल. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटासोबत असलेल्या आघाडीबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू होण्याआधी प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्यात आघाडी झाली होती. मुंबई महापालिका निवडणुका सोबत लढण्याची घोषणा दोन्ही नेत्यांनी केली होती. मात्र आता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, रे शिवसेना उद्धव ठाकगटआणि आमची आघाडी आता राहिलेली नाही. कारण आता महाआघाडीतील ४ घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. यामुळे ठाकरे गट आणि वंचितमध्ये आधी जी चर्चा झाली होती. 

त्याला आता महत्व राहिलेलं नाही. मी अनेकदा त्यांना याबाबत बोललो आहे. वंचितला जर महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आधी आपण दोघांनी चर्चा केली पाहिजे,मात्र त्या गोष्टी झाल्या नाहीत. म्हणून मी म्हणतो जर आमचं महाविकास आघाडी सोबत जमलं तरच उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती नाही तर आमचे मार्ग वेगवेगळे आहेत. असं आंबेडकर म्हणाले.

 

महाविकास आघाडीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तीन घटक पक्षातील जागावाटपाची तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात आम्ही प्रवेश करून काय करणार. आम्ही २६ मार्चनंतर त्यांच्या निर्णयाची वाट पाहणार नाही.आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र देत सात जागांवर पाठिंबा देण्याचे म्हटले आहे. त्यावर एकमत झाले तर ठीक, नाहीतर आम्ही २६ तारखेला आमची भूमिका स्पष्ट करणारच आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

IPL_Entry_Point