मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Live News Updates 25 March 2023

Live News

Live News Updates 25 March 2023: आता जिंकेपर्यंत लढायचं! उद्धव ठाकरेंची उद्या मालेगावात ‘शिवगर्जना'

Uddhav Thackeray sabha :उद्धव ठाकरे यांची मालेगावात विराट जाहीर सभा होणार आहे. शिवगर्जना असे या सभेला नाव देण्यात आले आहे.

Sat, 25 Mar 202312:19 PM IST

आता जिंकेपर्यंत लढायचं..! उद्धव ठाकरे यांची उद्या मालेगावात ‘शिवगर्जना’

उद्धव ठाकरे यांची मालेगावात विराट जाहीर सभा होणार आहे. शिवगर्जना असे या सभेला नाव देण्यात आले आहे. एस.एस.जी. कॉलेज ग्राउंड, लोकनेते व्यंकटराव हिरे मार्ग मालेगाव कॅम्प येथे सभा होणार आहे. रविवारी (२५ मार्च) सायंकाळी पाच वाजल्यापासून सभा सुरू होणार आहे.

Sat, 25 Mar 202309:54 AM IST

प्रा. ज्योती कांबळे यांना राजस्थानच्या सामर्थ्य सेवा संस्थानचा ‘सामर्थ्य ग्लोबल एक्सलेंस अवार्ड्स’ जाहीर

मुंबईतील अमिटी युनिवर्सिटीच्या प्रा. ज्योती कांबळे यांना सामर्थ्य ग्लोबल एक्सीलेंस अवार्ड्स एंड डिसएबिलिटीज एम्पावरमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे. कांबळे सध्या सहायक प्रोफेसर (क्लिनिकल साइकोलॉजिस्ट), एआयबीएएस, एमिटी यूनिवर्सिटी मुंबई येथे कार्यरत आहेत. दुसऱ्यांच्या जीवनात सुधार आणण्याच्या उद्देशाने मानव कल्याणाच्या हेतूने असामान्य काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. ज्योती कांबळे मूळच्या भोपाळ शहरातील आहेत. त्यांनी एम. फिल क्लीनिकल साइकोलॉजी, पीजी डिप्लोमा गायडेंस एंड काउंसलिंग, एमए- क्लिनिकल साइकोलॉजी आदि पदव्या घेतल्या आहेत. नुकतात त्यांना महिला दिवसाच्या निमित्त MMTV इंडिया आयकॉन अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना ५० ग्लोबल इंस्पायरिंग वुमन अवार्ड २०२३ ही मिळाला आहे.

प्रा. ज्योती कांबळे
प्रा. ज्योती कांबळे

Sat, 25 Mar 202309:15 AM IST

Chandrakant Patil : तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 पर्यावरणपूरक जीवनशैलीसह विकासाचा समतोल राखण्यासाठी तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन करण्याची आणि सामाजिक कार्याची संधी उपलब्ध करून देऊन,पर्यावरण हा विषय चळवळ म्हणून तो लोकाभिमुख बनविणे, काळाची गरज आहे”, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Sat, 25 Mar 202308:09 AM IST

Alandi : आळंदी येथे ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे रविवारी होणार वितरण

  राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी तसेच महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना फ्रुटवाला मैदान, आळंदी येथे रविवार २६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

Sat, 25 Mar 202308:08 AM IST

Pune : वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. राज्याच्या विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड यामुळे सिंचनाअभावी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळातील पावसाचे पाणी साठवणूक करुन उन्हाळा तसेच इतर टंचाईच्या कालावधीत पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सोय करण्याच्या दृष्टीने शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे ठरते.

Sat, 25 Mar 202306:48 AM IST

BMC : मुंबई महानगर पालिकेच्या आर्थिक व्यवहाराचा कॅगचा अहवाल सभागृहात सादर

BMC : मुंबई महानगर पालिकेच्या आर्थिक कामाची तपासणी करण्यासाठी तसेच करोना काळात करण्यात आलेल्या खरेदीची कामे तपासण्यासाठी कॅगने तपासणी केली होती. हा अहवाल सादर करण्यात आला असून यावर देवेंद्र फडणवीस सभागृहात माहिती सादर करत आहेत.

Sat, 25 Mar 202303:35 AM IST

Pune News : मानसिक आरोग्यासाठी 'आर्ट एक्स्प्रेस'

'एम्पॉवर', या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या मानसिक आरोग्य उपक्रमांतर्गत आर्ट थेरपीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या जागरूकतेसाठी 'आर्ट एक्स्प्रेस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मानसिक आरोग्याविषयी मौन तोडून संवाद वाढवणारा हा कार्यक्रम असून, या कार्यक्रमांत सुंदर आणि प्रेरणादायी कलाकृतींनी रक्षक चौक, जगताप डेअरी ते औंध बीआरटी रोड ते पिंपरी या मार्गावरील मोठी भिंत रंगवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. आज सकाळी ११.३० वाजता रक्षक चौक, जगताप डेअरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

Sat, 25 Mar 202301:16 AM IST

Election : राज्यातील २१ जिल्ह्यात निवडणूक साक्षरता मंच उपक्रम सुरू करणार : श्रीकांत देशपांडे

निवडणूक साक्षरता मंचच्या माध्यमातून पुण्यात मतदार जागृतीचे चांगले काम झाले असून येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यातील २१ जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केली.

Sat, 25 Mar 202301:15 AM IST

Pune : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी तीन शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Sat, 25 Mar 202301:13 AM IST

Pune : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यवर्षात कला क्षेत्रातील दिग्गजांचे पुण्यात स्मरण!

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था पुणे यांच्या माध्यमातून ‘नृत्यवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून कला क्षेत्रातील दिग्गजांना मानवंदना दिली जाणार आहे. जवळपास एक हजार शास्त्रीय नृत्य कलाकार आपल्या नृत्य कलेच्या माध्यमातून ही मानवंदना देणार आहेत.

Sat, 25 Mar 202301:09 AM IST

Pune : चेटीचंड महोत्सवातून सिंधी संस्कृतीचे दर्शन; सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७३ वा जन्मोत्सव साजरा

  भगवान साई झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन... भक्तीभावाने केलेली आरती... रॉकस्टार निल तलरेजा लाईव्ह कॉन्सर्ट... सिंधी गायिका निशा चेलानीचे बहारदार सादरीकरण... स्टॅन्ड अप कॉमेडियन मोहित शेवानीचे ओघवते निवेदन... सिंधी गीतांच्या ऐकाव्याश्या वाटणाऱ्या चाली... कलात्मक नृत्याविष्कार... चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद... रुचकर लंगर... डोक्यावर लाल टोपी आणि झुलेलाल यांचे अखंड भजन यातून नववर्षाच्या सुरुवातीला सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले. या वार्षिक महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

Sat, 25 Mar 202301:07 AM IST

MNS : मनसेची पुण्यात आज  पत्रकार परिषद

 काल रद्द झालेली मनसेची पत्रकार परिषद आज सकाळी ११  वाजता होणार आहे. पुण्येश्र्वर आणि नारायनेश्र्वर या दोन पुरातन मंदिराच्या बाबत मनसेने केलेल्या मागण्या आणि कार्यवाहीची माहिती पत्रकार परिषदेत देणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये मनसेने केलेल्या कायदेशीर गोष्टीची माहिती देण्यात येईल.

Sat, 25 Mar 202301:04 AM IST

Mumbai assembly session last day : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस 

मुंबई :  राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधकाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरती कायदा व सुव्यवस्था यावरून सरकारवरती मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे. 

maharashtra vidhan sabha
maharashtra vidhan sabha (HT)

Sat, 25 Mar 202301:01 AM IST

Rahul Gandhi : राहुल गांधींसाठी काँग्रेसचे आज पासून देशव्यापी आंदोलन; भाजपही करणार निदर्शने

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी शुक्रवारी रद्द करण्यात आली. यामुळे कॉँग्रेस आक्रमक झाली आहे. आज पासून देशभरात कॉँग्रेस आंदोनलन करणार आहे. तर राहुल गांधी यांनी माफी मागावी या साठी भाजप देखील आंदोलन सुरू करणार आहे.

Sat, 25 Mar 202301:00 AM IST

Rahul Gandhi Press Conference : कॉँग्रेस नेते राहुल गांधी आज १ वाजता घेणार पत्रकार परिषद 

दिल्ली :  काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांची दुपारी १  वाजता पत्रकार परिषद होणार आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी देशासाठी लढतोय, कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी अशा आशयाच ट्विट केल होतं. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.  

Sat, 25 Mar 202301:01 AM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी शुक्रवारी रद्द करण्यात आली. यामुळे कॉँग्रेस आक्रमक झाली आहे. आज पासून देशभरात कॉँग्रेस आंदोनलन करणार आहे. तर राहुल गांधी यांनी माफी मागावी या साठी भाजप देखील आंदोलन सुरू करणार आहे.