मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune koyta Gang : कोयता गँग टोळीचा म्होरक्या गजाआड; झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी

Pune koyta Gang : कोयता गँग टोळीचा म्होरक्या गजाआड; झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 15, 2023 10:39 AM IST

Pune koyta Gang crime news : पुण्यात स्वारगेट पोलिसांनी मोठी कारवाई करत गुलटेकडी परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगचा म्होरक्या असलेला सचिन माने याला अटक केली असून त्याच्या कडून शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहे.

Pune koyta Gang crime news
Pune koyta Gang crime news

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने उच्छाद मांडला आहे. गुलटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत देखील सचिन माने याच्या कोयता गॅंगने दहशत माजवली होती. पोलिसांनी मानेवर आधी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. मात्र, तरीही त्याची गुन्हेगारी कमी होत नसल्याने त्याच्या मुसक्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या. माने आणि त्याच्या नऊ साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काेयते, तलवार, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांना अटक करतांना झालेल्या झटापटीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ट्रेंडिंग न्यूज

सचिन परशुराम माने (वय २४), रोहित मधुकर जाधव (वय २७), अजय प्रमोद डिखळे (वय २४), यश किसन माने (वय १८), रोहित मधुकर जाधव (वय २७), अमर तानाजी जाधव (वय ३२), विजय प्रमोद डिखळे (वय १८), मोन्या उर्फ सूरज सतीश काकडे (वय २६, सर्व रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखील राकेश पेटकर (वय २२, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या कोयता गॅंगच्या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपी आणि त्यांचे साथीदार पल्या पासंगे (वय २१), आयुष किसन माने (वय २१ दोघे रा. गुलटेकडी), माया उर्फ अभिषेक पाटोळे (वय २२) प्रमोद उर्फ पम्या (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

माने याने ओैद्योगिक वसाहतीत एसएम कंपनी नावाने गुन्हेगारी टोळी सुरु केली होती. त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी असे गंभीर गुन्हे स्वारगेट, सहकारनगर, मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती. त्याला वर्षभरासाठी येरवडा पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.

दरम्यान, गुलटेकडी ओैद्योगिक वसाहतीत टोळी युद्धातून सचिन माने आणि साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार आणि साथीदारांवर कोयत्याने वार केले होते. माने आणि साथीदारांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली होती. तोडफोड करुन आरोपी माने साथीदारांसह पसार झाला होता. पसार झालेला माने घोरपडे पेठेत मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अटक करण्यात आली. दरम्यान, मानेला पकडतांना त्याने पोलिसांवरच कोयत्याने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी शिवा गायकवाड हे जखमी झाले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ गायकवाड, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारु, शिवा गायकवाड, अनिस शेख, दीपक खेंदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.

मैत्रिणीस भेटण्यास आला  आणि अडकला पाेलीस जाळयात

सदर टाेळीतील मुख्य आरोपी सचिन माने गुन्हा केल्यापासून पसार झाला हाेता. पाेलीसांना वारंवार गुंगारा देऊन ताे राहण्याची ठिकाणी बदलत हाेता. घाेरपडी पेठ येथे ताे त्याच्या मैत्रिणीस भेटणार येणार असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाेलीस पथकाने त्याच्यावर पाळत ठेऊन पहाटे दाेन वाजता सचिन माने त्याची स्वत:ची अाेळख लपवुन सदर ठिकाणी अाल्यावर पाेलीसांनी झडप घालून त्यास कमरेला असलेल्या काेयतासह अटक केली. यावेळी काेयता शिताफीने काढताना पाेलीस अंमलदार शिवा गायकवाड हे जखमी झाले. 

IPL_Entry_Point

विभाग