तिसरे महायुद्ध पेटणार? काळ्या समुद्रात रशियन जेट व अमेरिकी ड्रोनची टक्कर, दोन्ही देशांचे लष्कर अलर्ट
Russian jet collides with us drone : काळ्या समुद्रावर एक रशियन जेट विमान व एका अमेरिकी ड्रोनचा टक्कर झाली. ही माहिती अमेरिकेच्या लष्कराने दिली आहे. यामुळे दोन्ही देशाचे लष्कर अलर्ट झाले आहे.
यूक्रेन युद्धाच्या दरम्यान रशिया व अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण बनले असताना मोठी बातमी समोर आली आहे. वृत्तसंस्थांच्या हवाल्याने वृत्त आहे की, काळ्या समुद्रावर एक रशियन जेट विमान व एका अमेरिकी ड्रोनचा टक्कर झाली. ही माहिती अमेरिकेच्या लष्कराने दिली आहे. दरम्यान सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार एका रशियन फायटर जेटने अमेरिकन एयरफोर्सच्या ड्रोनला खाली उतरण्यास भाग पाडले.
ट्रेंडिंग न्यूज
मंगळवारी काळा समुद्रावरील आकाशात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जेव्हा रशियन जेट विमान व अमेरिकन MQ-९ रीपर ड्रोन आमने-सामने आले. रशियन जेटने अमेरिकी ड्रोनच्या प्रोपेलरला नुकसान पोहोचवले.
ही घटना तेव्हा घडली जेव्हा अमेरिकेचा रीपर ड्रोन आणि रशियाचे दोन फायटर जेट SU-२७ काळा समुद्राच्या वरती आंतरराष्ट्रीय जल सीमेत उड्डाण करत होते. सीएनएनने अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, यावेळी एक रशियन जेट जाणून बुजून अमेरिकी ड्रोनच्या समोर आले व जेटमधून ड्रोनवर तेल सांडू लागले. यावेळी दुसऱ्या जेटने ड्रोनच्या प्रोपेलरला नुकसानग्रस्त केले. हा प्रोपेलर ड्रोनच्या मागील बाजुस लागला होता. प्रोपेलर नुकसानग्रस्त झाल्यानंतर अमेरिकी लष्कराला आपले ड्रोन काळा समुद्रात उतरवणे भाग पडले.
यूएस एअरफोर्सचे जनरल जेम्स हेकर यांनी सांगितले की, आमचे MQ-९ ड्रोन आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत नियमित संचालन करत होते. त्यावेळी एक रशियन जेटने याला थांबवले व हल्ला केला. त्यानंतर ड्रोन कोसळले व पूर्णपणे ध्वस्त झाले.
अमेरिकेचे सर्वात शक्तीशाली ड्रोन आहे MQ-9 रीपर –
MQ-९ रीपर ड्रोन अमेरिकी लष्कराकडून वापरण्यात येणारे सर्वात अपडेटेड मानव रहित विमान (यूएवी) पैकी एक आहे. हे सर्वात अडव्हांस सेंसर, कॅमेरे आणि शस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे. हे उंचावरून सर्वाधिक काळ उडू शकते.
हे ड्रोन अनेक प्रकारच्या मोहिमा फत्ते करण्यास सक्षम आहे. ज्यामध्ये गोपनीय माहिती मिळवणे आणि उंचीवरूनच शत्रुंच्या ठिकाणांवर टार्गेटेड हल्ला करण्यास सक्षम आहे.
विभाग