मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fake Currency : परभणीत ‘फर्जी’वाडा.. प्रिंटरवर छापल्या दोनशेच्या बनावट नोटा, १९ वर्षीय तरुणाला अटक

Fake Currency : परभणीत ‘फर्जी’वाडा.. प्रिंटरवर छापल्या दोनशेच्या बनावट नोटा, १९ वर्षीय तरुणाला अटक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 15, 2023 12:35 AM IST

fake currency printe in Parbhani : प्रिंटरवर२०० रुपयांच्याबनावट नोटा छापून बाजारात आणणाऱ्या एका १९ वर्षीयतरुणालापरभणी पोलिसांनी अटक केली आहे.

fake currency printe in Parbhani
fake currency printe in Parbhani

ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर'फर्जी'हीवेब सीरिज खूपच चर्चेत आहे. बनावट नोटा तयार करण्यावर ही वेब सीरिज आधारित आहे. अशाच प्रकारचे एक प्रकरण परभणीत समोर आले आहे. प्रिंटरवर २०० रुपयांच्या बनावट नोटा छापून बाजारात आणणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला परभणी पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण मानवत येथील असून पोलिसांनी २०० च्या बनावट नोटा, प्रिंटर, कागद व अन्य साहित्य जप्त केले आहे. विशाल संतोष खरात (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

मानवतमध्ये स्थानिक गुन्हे शाखेला बनावट नोटांची छपाई होत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मानवतमध्ये एकजण बनावट नोटा छापत असल्याच्या माहितीनंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. मानवतमधील खंडोबा रोड येथील एका घरात हा प्रकार सुरू होता.

विशाल खरातला ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रिंटरवर बनावट नोटा छापत असल्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी २०० च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एकाच क्रमांकाच्या २७ नोटा, दुसऱ्या क्रमांकाच्या दोन नोटा आणि तिसऱ्या क्रमांकाची एक नोट अशा एकूण २०० रुपये किंमतीच्या ३० नोटा जप्त केल्या आहेत.

या कारवाईत पिक्समा जी २०१० प्रिंटर, रिफील इंक, हिरवी, सिल्वर, पोपटी आणि गुलाबी रंगाची चिकटपट्टी, नटराज कंपनीचे पांढरे पेपर, ११५ पांढऱ्या रंगाचे पेपर ज्यावर दोन्ही बाजूने २०० च्या छापलेल्या बनावट नोटा, विविध कंपन्यांचे पांढरे पेपर असा मुद्देमाल जप्त केला.आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०,४८९ (अ), ४८९ (क), ४८९ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग