मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बंडातात्या कराडकरांची प्रकृती खालावली, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू

बंडातात्या कराडकरांची प्रकृती खालावली, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 13, 2023 05:34 PM IST

Kirtankar Bandatatya Karadkar : पक्षाघाताचा झटका आल्यानंतर हभप बंडातात्या कराडकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Bandatatya Karadkar Health Update
Bandatatya Karadkar Health Update (HT)

Bandatatya Karadkar Health Update : राज्यातील जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झटक्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. गोहत्याबंदी आणि व्यसनमुक्ती आंदोलनात बंडातात्या कराडकरांनी मोठी भूमिका बजावलेली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सातारा जिल्ह्यातील फलटणच्या आश्रमात बंडातात्यानं चक्कर आल्यामुळं ते अचानक खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यामुळं त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यामुळं आता बंडातात्या कराडकर यांच्या स्वास्थासाठी आणि प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

राज्यात गोहत्याबंदीचा कायद्यासाठी बंडातात्या कराडकर यांनी अनेकदा आंदोलनं केलेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची गाडी अडवून धरली होती. याशिवाय त्यांनी १९९६ साली एक संस्था स्थापन करून व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्याचं काम केलेलं आहे. याशिवाय राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती तरुणांपर्यंत पोहचावी यासाठी त्यांनी अनेकदा प्रतापी संस्कार सोहळ्यांचं आयोजनही केलेलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी समाजात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन २०१९ साली केंद्र सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग