मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच होणार; सरकारनं महामंडळाला दिले ३०० कोटी

ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच होणार; सरकारनं महामंडळाला दिले ३०० कोटी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 13, 2023 05:54 PM IST

MSRTC Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं ३०० कोटींचा निधी वितरीत केला आहे. आजच पगार होणार असल्यानं कर्मचाऱ्यांची संक्रात गोड होणार आहे.

Shinde-Fadnavis Govt
Shinde-Fadnavis Govt

MSRTC Employee Salary : गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नसल्यानं राज्यातील अनेक एसटी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं तातडीनं महामंडळाला ३०० कोटींचा निधी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन आजच त्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर आता कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे. सरकारनं दिलेल्या रकमेतून कर्मचाऱ्यांचा फक्त पगार होणार असून ग्रॅज्यूटी किंवा पीएफचे पैसे भरले जाणार नसल्याची माहिती आहे.

संपकाळासह गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नव्हता. त्यामुळं संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्याची सरकारकडून दखल घेण्यात आली असून आजच्या आज सर्व कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा आदेश शिंदे-फडणवीस सरकारनं काढला आहे. त्यामुळं आता अनेक महिन्यांचा पगार एकाचवेळी खात्यात जमा होणार असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पगाराची रक्कम अपुरीच, काँग्रेसचा आरोप...

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आजच होणार असले तरी त्यासाठी महामंडळाला देण्यात आलेली रक्कम अपुरी असल्याचा आरोप काँग्रेसप्रणित एसटी संघटनेनं केला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित अन्य १६ मागण्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारशी चर्चा केली जाणार असल्याचंही काही संघटनांनी स्पष्ट केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा ३६० कोटी रुपये देण्याची हमी सरकारनं कोर्टात दिली होती. त्यामुळं ३०० कोटींची रक्कम अपुरी असून उर्वरीत १२०० कोटी रुपयेही सरकारनं एसटी महामंडळाला द्यावेत, अशीही मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं केली आहे.

IPL_Entry_Point