मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rapido Services : पुण्यातील रॅपिडोची सेवा तातडीनं बंद करा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Pune Rapido Services : पुण्यातील रॅपिडोची सेवा तातडीनं बंद करा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 13, 2023 03:59 PM IST

Rapido Services Ban : बाईक टॅक्सीची सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीला पुणे शहरातील सेवा तात्काळ बंद करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

Rapido Services Ban In Pune city
Rapido Services Ban In Pune city (HT)

Rapido Services Ban In Pune city : अनेक शहरांमध्ये बाईक आणि टॅक्सीची सेवा देणाऱ्या रॅपिडो कंपनीला मुंबई हायकोर्टानं मोठा दणका दिला आहे. आजपासून पुणे शहरातील रॅपिडोची सेवा तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं काढले आहेत. त्यानंतर आता रॅपिडो कंपनीकडून महाराष्ट्रातील सर्व शहरांमधील सेवा बंद केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात रॅपिडो कंपनीविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षाचालक आंदोलन करत असून त्यातच आता हायकोर्टानं रॅपिडोची सेवा बंद करण्याचा आदेश काढल्यानं रिक्षाचालकांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे.

पुण्यात रॅपिडोची सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी अनेक भागांतील रिक्षाचालकांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर उच्चशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील रॅपिडोची सेवेला तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतरही शहरातील अनेक भागांमध्ये रॅपिडोची सेवा सुरुच असल्याचा आरोप करत रिक्षाचालकांच्या संघटनांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आता कोर्टानं शहरातील रॅपिडोची सेवा बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानंतर आता शहरातील नागरिकांनी दुचाकी आणि तीन चाकी टॅक्सीचा वापर न करण्याचं आवाहन आरटीओकडून करण्यात आलं आहे. याशिवाय रॅपिडोचा वापर करून त्याद्वारे प्रवास न करण्याचा आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.

परवाना नसतानाही कंपनीकडून सुरू होती सेवा....

बाईक आणि टॅक्सीची सेवा पुरवण्याचा परवाना रॅपिडो कंपनीकडे नव्हता. याशिवाय वाहतुकीसह डिलिव्हरीचंही लायसन्स रॅपिडोकडे नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर कोर्टानं कंपनीच्या सर्व सेवांवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता रॅपिडो कंपनीविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात बंडगार्डन पोलिसांनी कलमवाढ केली आहे. याशिवाय पुण्यातील अनेक भागात रॅपिडो कंपनीच्या मूळ मालकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

IPL_Entry_Point